Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedसेवा पंधरवाडा कार्यक्रम पूर्व तयारी आढावा बैठक संपन्न

सेवा पंधरवाडा कार्यक्रम पूर्व तयारी आढावा बैठक संपन्न

पुणे, दि. 9 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राज्यस्तरीय सेवा पंधरवाड्याचे आयोजन करण्यात येणार आहे; या अभियानाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 17 सप्टेंबर रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे करण्यात येणार आहे, याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या उपस्थितीत पूर्व तयारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

 

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या परवानगीने आयोजित बैठकीत यावेळी तहसीलदार श्वेता पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

 

श्रीमती कदम म्हणाल्या, या कार्यक्रमात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या तसेच अनुकंपा तत्वावरील पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील विविध योजनांअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे, त्यामुळे सर्व संबंधित विभागाने विहीत वेळेत कार्यवाही होण्याच्यादृष्टीने नियोजन करुन कामे करावीत. लाभार्थ्यांची संख्या विचारात घेता वाहन व वाहनतळाची व्यवस्था करावी. कार्यक्रमाच्या दिवशी गणेश कला क्रीडा रंगमंच यैथे विविध विभागाच्या सेवांबाबत दालने (स्टॉल) लावावीत, यामध्ये महिला बचत गटांचा समावेश करावा. राज्यस्तरीय कार्यक्रमाची व्याप्ती विचारात घेता सर्व संबंधित विभागानी समन्वयाने कामे करावीत.

 

या बैठकीत कार्यक्रम पत्रिका तयार करणे, सभागृह सुशोभिकरण, भोजन व अल्पोहार व्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा, प्रचार व प्रसिद्धी, वैद्यकीय सहाय्य व रुग्णवाहिका व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन, मंच, विद्युत, सुरक्षा, लाभार्थी, अधिकारी व कर्मचारी, पत्रकारांची बैठक व्यवस्था आदी बाबत आढावा घेण्यात आला.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments