Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय पातळीवर कौशल्य स्पर्धेचे आयोजन

जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय पातळीवर कौशल्य स्पर्धेचे आयोजन

पुणे दि. 9 (जिमाका वृत्त सेवा) : शांघाई येथे 2026 मध्ये आयोजित होणा-या जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने 63 क्षेत्रांशी संबंधित कौशल्य स्पर्धा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्कील कौन्सिल, विविध औदयोगिक आस्थापना यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे.

 

या स्पर्धेत निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत. जागतिक कौशल्‍य स्पर्धा 2026 करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष असून Additive Manufacturing, Cloud Computing, Cyber Security, Digital Construction, Industrial Design Technology, Mechatronics, Robot System Integration, Water Technology,ICT Network Infrastructure, Industry 4.0, Optoelectronic Technology, Dental Prosthetics व Aircraft Maintenance या क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म दि.01 जानेवारी 2001 किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे. इतर 50 क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म दि. 01 जानेवारी, 2004 त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे. याकरिता अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2025 हा आहे.

 

तरी, इच्छुक उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in/ या वेबपोर्टलला भेट देऊन दि. 30 सप्टेंबर 2025 पूर्वी नाव नोंदणी करावी. असे आवाहन सु.रा.वराडे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पुणे यांनी केले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments