पुणे, 8 सप्टेंबर २०२५: भारतातील विश्वासार्ह दागिने ब्रँड आणि १९२ वर्षांची परंपरा लाभलेले पीएनजी ज्वेलर्स पुन्हा एकदा आपल्या बहुप्रतीक्षित “प्युअर प्राइस ऑफर” मोहिमेसह सज्ज झाले आहे. १ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणारी ही योजना आगामी सण व लग्नसराईच्या हंगामात ग्राहकांना सोने खरेदी करताना आर्थिक दिलासा आणि आत्मविश्वास देण्यासाठी खास तयार करण्यात आली आहे.
सोन्याच्या किंमतीत सतत होणाऱ्या वाढीचा विचार करून, ही मोहिम ग्राहकांना योग्य समाधान देणारी आहे. या योजनेत ग्राहकांना त्यांच्या आवडीचे सोनं किंवा हीऱ्यांचे दागिने १ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०२५ या कालावधीत विद्यमान दराने प्री-बुक करण्याची संधी मिळते जर नंतर सोन्याचा दर वाढला, तरीही त्यांना आधीच्या कमी दराचा लाभ मिळतो. आणि जर दर कमी झाला, तर पीएनजी ज्वेलर्स बिलिंगवेळी कमी झालेला दर मान्य करून ग्राहकांना दिलासा देते. अशा प्रकारे ग्राहक नेहमीच फायद्यात राहतात.
ही योजना ग्राहकांचा ताण कमी करून सोनं खरेदी अधिक सोपी आणि खात्रीशीर करते. त्यामुळे ग्राहक किंमतीतील चढ-उताराची चिंता न करता दागिन्यांच्या डिझाईन्स निवडण्यात लक्ष केंद्रित करू शकतात.
या मोहिमेबाबत पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, “भारतीय कुटुंबांसाठी सोनं ही केवळ गुंतवणूक नसून भावनिक आणि सांस्कृतिक दृष्टीनेही महत्त्वाची गोष्ट आहे. “प्युअर प्राइस ऑफर” च्या माध्यमातून आम्हाला ग्राहकांना पारदर्शक, निश्चिंत आणि फायद्याचा खरेदी अनुभव द्यायचा आहे. हीच ग्राहक आणि पीएनजी ज्वेलर्समधील विश्वासाची जोडणी आहे.”
ग्राहकांना “प्युअर प्राइस ऑफर” चा लाभ पीएनजी ज्वेलर्सच्या महाराष्ट्रातील सर्व लनांमध्ये घेता येणार आहे. या योजनेतून ग्राहकांसाठी उत्कृष्ट कारागिरी, पारदर्शकतेची खात्री आणि विश्वासासह उत्तम सेवा प्रदान करण्यासाठी उत्सुकतेने पीएनजी ज्वेलर्स वाट पा
हत आहे.


