Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedनॅक पॅकेजिंग लिमिटेडने सेबीकडे डीआरएचपी दाखल केले

नॅक पॅकेजिंग लिमिटेडने सेबीकडे डीआरएचपी दाखल केले

नॅक पॅकेजिंग लिमिटेडने (कंपनी) आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (सेबी) दाखल केला आहे.

 

ही कंपनी एक आघाडीची, एकात्मिक व नाविन्यपूर्ण, निर्यातकेंद्री आणि शाश्वततेवर भर देणारी पॅकेजिंग सोल्यूशन्स प्रदाता आहे. कंपनी विविध प्रकारच्या प्रिंटेड आणि लॅमिनेटेड वोव्हन पॉलिप्रोपिलीन (PLWPP) बॅग्स तसेच पीएलडब्ल्यूपीपी पिंच बॉटम बॅग्स तयार करते. वित्त वर्ष 2025 मध्ये कंपनीचा भारतीय बाजारपेठेत फ्लेक्सिबल बल्क पीएलडब्ल्यूपीपी बॅग्स (पिंच बॉटम बॅग्ससह) या विभागात सुमारे 10.1 % बाजारहिस्सा होता. (स्रोत : टेक्नोपॅक रिपोर्ट)

 

पीएलडब्ल्यूपीपी (PLWPP) बॅग्स या उच्च-शक्तीच्या पॅकेजिंग सोल्यूशन्स असून त्यांचा वापर खाद्यपदार्थ, पाळीव प्राण्यांचे खाद्य यांसह विविध क्षेत्रांमध्ये होतो. या बॅग्समुळे ब्रँडची दृश्यता वाढते, बनावटपणाचा धोका कमी होतो तसेच कार्यक्षमतेत सुधारणा घडते.

 

नॅक पॅकेजिंग लिमिटेडने प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ)द्वारे भांडवल उभारण्याची योजना आखली आहे. या इश्यूचा एकूण आकार (Total Offer Size) असा असेल फ्रेश इश्यू : ₹4,7,50 दशलक्ष (₹475 कोटी) पर्यंत आणइ ऑफर फॉर सेल (OFS) : 70,00,000 इक्विटी शेअर्स इतका असेल.

 

कंपनीने आयपीओतून उभारण्यात येणाऱ्या निव्वळ निधीचा उपयोग प्रामुख्याने गुजरातमधील कडी (मेहसाणा) तालुक्यातील बोरीसणा येथे नवीन उत्पादन केंद्र उभारण्यासाठी आवश्यक भांडवली खर्चासाठी करण्यात येणार आहे. यासाठी अंदाजे ₹4,350 दशलक्ष (₹435 कोटी) खर्च अपेक्षित आहे. उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरली जाईल. (Objects of the Offer)

 

या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स म्हणून सिस्टेमॅटिक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड, आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स अँड सिक्युरिटीज लिमिटेड आणि पॅंटोमॅथ कॅपिटल अॅडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेड कार्यरत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments