गणेश चतुर्थीच्या दिवशी भारतातील ग्राहकांनी 1 लाखांहून अधिक ऑर्डर दिल्या
मावा मोदक ग्राहकांच्या पसंतीस उतरला, परंतु केशर मोदक, खोबऱ्याचे मोदक, उकडीचे मोदक आणि काजू मोदक हे सुद्धा या स्पर्धेत उतरले.
मुंबई, 12 सप्टेंबर 2025: भारतातील अग्रेसर सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या स्विगीने (स्विगी लिमिटेड, NSE: SWIGGY / BSE: 544285) आज सांगितले की, देशभरात भक्तांच्या आवडता पदार्थ असलेल्या मोदकासह उत्साहात यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गणेशोत्सवादरम्यान (26 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2025 दरम्यान), भारतातील ग्राहकांनी स्विगीवर तब्बल 2,28,102 मोदकांची ऑर्डर दिली.
साजरीकरणाचा आठवडा
संपूर्ण उत्सव काळात भक्तांची मोदकांची भूक अगदीच मोठी होती. स्विगीला मिळालेल्या ऑर्डरमध्ये केवळ ऑगस्ट म्हणजेच गणेश चतुर्थी या एका दिवशी 1 एका दिवसात तिपटीने वाढ झाली, 26 ऑगस्ट यादिवशी 29,674 ऑर्डर मिळाल्या तर 26 प्लॅटफॉर्मवरील ऑर्डर्समध्ये फक्त एका दिवसात तिप्पट वाढ झाली म्हणजेच 29,674 ऑर्डर मिळाल्या. गेल्या वर्षीच्या गणेश चतुर्थीच्या तुलनेत स्विगीच्या ऑर्डर्समध्ये 35% पेक्षा जास्त वाढ झाली.
भारतामध्ये साजरा होणाऱ्या मोदक उत्सवात महाराष्ट्र अग्रेसर
गणेशोत्सव साजरा करण्यात महाराष्ट्र आघाडीवर होता कारण मुंबईने 69,240 मोदक ऑर्डर केलेत तर पुण्याने 30,433 मोदकांची ऑर्डर केली. त्यानंतर महाराष्ट्रात नागपूर, नाशिक आणि अमरावतीचा क्रमांक लागतो.
देशभरात उत्सवाचा उत्साह पसरत असताना, राष्ट्रीय स्तरावर गणेशोत्सव असलेल्या आठवड्यात मुंबई आणि पुणे अव्वल स्थानावर होते, तर बंगळुरू तिसऱ्या स्थानावर होते, त्यानंतर दिल्ली आणि कोलकाता यांचा क्रमांक लागतो. उदयोन्मुख शहरे देखील उत्सवात सहभागी झाली होती, नाशिक, वडोदरा, सुरत, डेहराडून आणि पटना हे सर्वोत्तम 5 मध्ये होते.
नवीन प्रकारचे मोदक
महाराष्ट्रातील पारंपारिक उकडीच्या मोदकांपासून ते भारतातील केसर आणि मावा या आवडत्या मोदकांपर्यंत, स्विगीकडे आलेल्या डेटानुसार गणेशोत्सव 2025 मध्ये परंपरा आणि सुविधा यांमधील पडलेले अंतर कसे भरून काढले हे लक्षात येते.
राष्ट्रीय स्तरावर, मावा मोदक (8742 ऑर्डर्स) ही सर्वात जास्त पसंतीची निवड ठरली, त्यानंतर केसर मोदक, खोबऱ्याचे मोदक, उकडीचे मोदक आणि काजू मोदक यांचा क्रमांक लागतो.
महाराष्ट्रात, उकडीच्या मोदकांची 4,460 ऑर्डर मिळाल्यामुळे परंपरेचे महत्त्व दिसून आले, त्यानंतर मावा आणि मलाई मोदकांच्या ऑर्डरची संख्या होती. लहान पॅक आकाराने सुद्धा प्रसिद्धी मिळवली, मावा मोदकाला (2 नग) ला 2,983 ची
ऑर्डर मिळाली.
***


