उत्पादन
एमआरपीमध्ये कपात (रूपयांमध्ये)
ट्रॅव्हलर
१.१८ लाख रूपये ते ४.५२ लाख रूपये
ट्रॅक्स
२.५४ लाख रूपये ते ३.२१ लाख रूपये
मोनोबस
२.२५ लाख रूपये ते २.६६ लाख रूपये
अर्बनिया
२.४७ लाख रूपये ते ६.८१ लाख रूपये
गुरखा
९२.९ हजार रूपये ते १.२५ लाख रूपये
पुणे, सप्टेंबर १२, २०२५: फोर्स मोटर्स लिमिटेड ही आघाडीची ऑटोमोटिव्ह कंपनी आणि भारतातील सर्वात मोठ्या व्हॅन उत्पादक कंपनीने आज त्यांच्या वेईकल्सच्या संपूर्ण श्रेणीवर सुधारित किमतींची घोषणा केली, ज्यामध्ये ट्रॅव्हलर, ट्रॅक्स, अर्बनिया, मोनोबस आणि गुरखा यांचा समावेश आहे. या सुधारित किमती २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होतील. सणासुदीचा काळ सुरू होत असताना कंपनी ग्राहकांना सुधारित १८ टक्के जीएसटीचे संपूर्ण फायदे देणार आहे.
ही घोषणा करत फोर्स मोटर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रसन फिरोदिया म्हणाले, ”प्रस्तावित जीएसटी दर कपात ऑटोमोटिव्ह उद्योगामधील महत्त्वपूर्ण सुधारणा आहे आणि फोर्स मोटर्समध्ये आम्ही २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत जीएसटी दर कपातीचे स्वागत करतो. हा पुढाकार महत्त्वपूर्ण गतीशीलता विभागांमध्ये अर्थपूर्ण बदल घडवून आणेल. मास मोबिलिटी सोल्यूशन्स जसे ट्रॅव्हलर, अर्बनिया व ट्रॅक्स अधिक सहजसाध्य होतील, सुरक्षित व अधिक विश्वसनीय सार्वजनिक परिवहन सक्षम करतील. तसेच रूग्णवाहिकांना देखील या कपातीमधून फायदा होईल, आरोग्यसेवा प्रदात्यांवरील आर्थिक भार कमी होईल आणि महत्त्वपूर्ण केअर पायाभूत सुविधा मजबूत होईल.”
ते पुढे म्हणाले, ”तसेच, नुकसानभरपाई उपकर काढून टाकणे हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे, त्यामुळे जीएसटी कराचे एकूण प्रमाण कमी होण्यास मदत होईल. या संरचनात्मक बदलामुळे या क्षेत्रातील मागणी आणखी वाढेल आणि सणासुदीच्या काळात खरेदीला गती मिळेल अशी अपेक्षा आहे. प्रतिष्ठित फोर्स गुरखाला देखील जीएसटी दर कपातीचा फायदा होईल, ज्यामुळे उद्देशपूर्ण, मजबूत गतिशीलता अधिक सहजसाध्य होईल. याव्यतिरिक्त, इंजिन, पार्ट्स व कम्पोनण्ट्सवरील कमी दर पुरवठा साखळी मजबूत करतील आणि सरकारच्या ‘मेक-इन-इंडिया’ दृष्टिकोनाला प्रबळ गती देतील.”
सणासुदीच्या काळात मागणी वाढत असताना ग्राहकांना त्यांच्या वेईकलच्या वेळेवर डिलिव्हरीच्या खात्रीसाठी लवकर बुकिंग करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


