स्पेशालिटी केमिकल इंटरमीडिएट्स उत्पादक कंपनी सुप्रित केमिकल्स लिमिटेड तर्फे सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे त्यांच्या प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) साठी ड्राफ्ट रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस (डीआरएचपी) सादर करण्यात आले आहे.
ही कंपनी गुंतागुंतीच्या जटिल रिअॅक्शन्स हाताळण्याचे कौशल्य असलेल्या काही मोजक्या स्पेशालिटी केमिकल इंटरमीडिएट्स कंपन्यांपैकी एक आहे. त्यामध्ये 15 पेक्षा जास्त केमिस्ट्रीज आणि 15 पर्यंत मल्टी-स्टेप युनिट ऑपरेशन्स आणि प्रोसेसेसचा समावेश होतो. यामुळे त्यांना विविध प्रकारच्या एंड-प्रॉडक्ट्स आणि ॲप्लिकेशन्सच्या गरजा पूर्ण करता येतात. ही कंपनी काही विशिष्ट स्पेशालिटी केमिकल इंटरमीडिएट्सच्या प्रमुख उत्पादकांपैकी एक आहे. त्यामध्ये ॲरोमॅटिक ॲमाइन्स, सल्फोनॅमाइड्स आणि ॲमिनो फिनॉल्स फॅमिलीजवर आधारित एमसीए, सल्फोनॅमाइड्स आणि NAPSA आहेत. (स्रोत: F&S अहवाल)
कंपनीची आयपीओ द्वारे निधी उभारण्याची योजना आहे. त्यामध्ये इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूद्वारे एकूण 499 कोटी रु. इतकी रक्कम उभारली जाणार आहे.
निव्वळ उत्पन्नाचा वापर पुढील गोष्टींसाठी केला जाणार आहे:
(अ) उत्पादन केंद्र ४ साठी भांडवली खर्चासाठी वित्तीय पुरवठा करणे. त्याचा अंदाजे खर्च 310 कोटी रु. आहे; (ब) काही कर्जाची परतफेड/प्रीपेमेंट, अंदाजे 65 कोटी रु. (क) आणि उर्वरित रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टासाठी.
कंपनीचे स्पेशालिटी केमिकल इंटरमीडिएट्स तयार करण्यात विशेष प्राविण्य असून जटिल केमिस्ट्रीज आणि मल्टी-स्टेप युनिट ऑपरेशन्स हाताळण्यात प्रचंड कौशल्य आहे. त्यांची उत्पादने विविध एंड-यूज इंडस्ट्रीजना सेवा पुरवतात. त्यामध्ये वस्त्रोद्योग, औषधनिर्माण, परफॉर्मन्स केमिकल्स, पर्सनल केअर, कृषी रसायने आणि इतरांचा समावेश आहे.
आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीने 103% नफ्यात वाढ नोंदवली. मागील वर्षातील 25.6 कोटी रु. वरून तो 51.9 कोटी रु. इतका नोंदवला गेला. त्याच कालावधीत महसूल 51.2% वाढून 362.5 कोटी रु. झाला. आर्थिक वर्ष 2024 मध्ये तो 239.8 कोटी रु. इतका होता.
डीआरएचपी नुसार दीपक नायट्राईट, आरती इंडस्ट्रीज, अतुल, बालाजी ॲमाइन्स, अल्किल अमाइन्स केमिकल्स, निओजेन केमिकल्स आणि रॉसारी बायोटेक हे सूचीबद्ध पिअर्स आहेत.
आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड हे या इश्यूचे एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.


