Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedअधिक संशोधनामुळे भारत फेरोसिमेंट तंत्रज्ञान बांधकाम क्षेत्रात प्रमुख देश बनेल ‌‘बीएनसीए‌’तील फेरोसिमेंट...

अधिक संशोधनामुळे भारत फेरोसिमेंट तंत्रज्ञान बांधकाम क्षेत्रात प्रमुख देश बनेल ‌‘बीएनसीए‌’तील फेरोसिमेंट आंतरराष्ट्रीय परिषदेत अभय पुरोहित यांचा विश्वास

पुणे, दि. 16 : लोखंडाच्या जाळीचा वापर बांधकामात करण्यात आलेले पर्यावरणपूरक, वजनाला हलके, अत्यंत मजबूत व कमी खर्चिक असणाऱ्या फेरोसिमेंट तंत्रज्ञानाची सेवा पुरवणारा भारत त्यात अधिक संशोधन केल्यानंतर लवकरच जगातला प्रमुख देश बनेल, असा विश्वास, कौन्सिल ऑफ आकिटेक्चरचे (सीओए) अध्यक्ष अभय पुरोहित यांनी व्यक्त केला. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) व फेरोसिमेंट सोसायटी, पुणे यांनी आयोजित केलेल्या आठव्या आंतरराष्ट्रीय परिषद 2025 च्या उद्घाटनप्रसंगी पुरोहित बोलत होते.

 

‌‘कला, विज्ञान व तंत्रज्ञानातील फेरोसिमेंटचे बांधकाम‌’ या मध्यवर्ती विषयावरील दोन दिवसांच्या परिषदेत भारतासह, इटली, अमेरिका, इंग्लंड आणि बांगलादेशातील तज्ज्ञांनी विचार मांडले. उद्घाटन प्रसंगी पुरोहित यांच्यासह महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य जयंत इनामदार, बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप, उपप्राचार्य डॉ. शार्वेय धोंगडे, फेरोसिमेंट सोसायटीचे अध्यक्ष पी पी लेले, परिषदेचे संयोजक डॉ. कल्याण सुंदरम, व्हॅसकॉन इंजिनियर्स लिमिटेडचे प्रकल्प संचालक विवेक बोत्रे, अल्ट्राटेक सिमेंटचे संदीप बन्सल, आर्किटेक्ट्स इंजिनियर्स ॲण्ड सव्हेअर्स असोसिएशन उर्फ ‌‘एसा‌’चे अध्यक्ष प्रा. महेश बांगड, परिषदेच्या सहनिमंत्रक डॉ. सुजाता मेहता, प्रा. कांचन अतनुरकर, आयोजन समितीचे प्रा. स्वप्नील शिंदे आणि प्रा. प्रीती नामजोशी तसेच फेरोसिमेंट सोसायटीचे पदाधिकारी इंजिनीयर गिरीष सांगळे, इंजिनीयर नंदकुमार जाधव, इंजिनीयर पुष्यमित्र दिवेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रा. श्वेता अलबाल यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. यावेळी सीओए आणि बीएनसीएच्या वतीने फेरोसिमेंट संबंधीच्या क्रांतिकारी कामावरील तयार करण्यात येणाऱ्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन करण्यात आले.

 

फेरोसिमेंटचा आर्किटेक्चरमधील बांधकामांसाठी लागणाऱ्या गुंतागुंतीच्या आकृतीबंधांसाठीचा वापर आता अपरिहार्य झाला आहे, असे पुरोहित यांनी सांगितले. ते म्हणाले की, यासाठी फेरोसिमेंटचा वापर करणाऱ्या स्थानिक कारागिरांशी संपर्क वाढवून त्यातील नवनव्या शक्यता आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या संदर्भात आजमावून पाहण्याची दुर्मिळ संधी आजच्या व येणाऱ्या आर्किटेक्चरमधील पिढ्यांनी घेतली पाहिजे. त्यासाठी फेरोसिमेंटच्या जास्तीत जास्त वापरासंबंधीची चळवळ सुरू झाली असून थ्रीडी प्रिंटींगच्या क्षेत्रात वास्तू उभारणीसाठी फेरोसिमेंटचा क्रांतिकारी वापर करण्यासंबंधीचे संशोधन सुरू आहे.

 

डॉ. लिबेराटो फेरारा यांनी आपल्या सादरीकरणात जागतिक हवामान व पर्यावरणीय बदलांमुळे बांधकामातील विविध घटकांना धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, यासाठी आता शाश्वत साहित्याची गरज असताना फेरोसिमेंट हा त्यावरील प्रभावी उपाय आहे.

 

डॉ.कल्याण सुंदरम यांनी फेरोसिमेंटची प्राथमिक माहिती सांगताना आता देशातील प्रत्येक प्रगत बांधकाम रचनेत फेरोसिमेंट अपरिहार्य झाले असून पाणी साठवण्यासंबंधीच्या प्रत्येक बांधकामामध्ये येणारा खर्च कमी करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल.

 

बांगला देशातील महमूद अबू सादिक यांनी सध्याच्या पर्यायी बांधकामासाठी फेरोसिमेंट हाच शाश्वत पर्याय असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, बांगला देशातील नैसर्गिक संकटांशी मुकाबला करण्यासाठी भविष्यात परवडेल व टिकेल असे फेरोसिमेंटच उपयोगी ठरेल.

 

डॉ. गोविंदराज यांनी त्यांच्या सादरीकरणात फेरोसिमेंटचा वापर पाण्याशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या बांधकामाशी येत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, वजनाने हलके, कमी जाडीचे व अत्यंत भक्कम असणारे फेरोसिमेंट तंत्रज्ञान पाण्याच्या टाक्यांबरोबर विविध प्रकारचे खांब व कलात्मक छत तयार करण्यासाठी ते अधिक उपयुक्त ठरत आहे.

 

अमेरिकेतील फेरोसिमेंटचा वापरासंबंधी भाष्य करताना इजिनियर ओवेन यांनी तेथील विविध प्रकारच्या बांधकामांमध्ये या तंत्रज्ञानाच्या वापरासंबंधीचा आढावा घेतला.

 

डॉ. कश्यप यांनी फेरोसिमेंटसंबंधी आर्किटेक्चर क्षेत्रात येऊ घातलेल्या नव संकल्पनांचे शैक्षणिक क्षेत्रात स्वागत होईल असे आश्वासन दिले. तर इनामदार यांनी फेरोसिमेंट हेच भविष्यातील आव्हानांना तोंड देणारे प्रभावी साधन असल्याचे सांगितले. फेरोसिमेंट सोसायटीचे अध्यक्ष इंजिनियर लेले यांनी फेरोसिमेंटचा वापर तळागाळापर्यंत पोचण्यासाठीच्या प्रयत्नांवर आपल्या भाषणातून भर दिला.

 

आर्किटेक्ट सेंथील डॉस म्हणाले की, फेरोसिमेंटच्या वापरामुळे विविध प्रकारच्या बांधकामांमध्ये एकात्म (इंटिग्रेटेड) आकृतीबंध तयार करताना वळणदार आकार देतानाही त्यामध्ये भक्कमपणाबरोबर लवचिकताही आणताना एखाद्या शिल्पाप्रमाणे आविष्कार करता येतो. निसर्गपूरक वातावरणाशी मिळताजुळता ‌‘वन विथ द नेचर‌’ या फेरोसिमेंटने तयार करण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण आकृतीबंधाचे डॉस यांनी सादरीकरण केले.

 

फेरोसिमेंटच्या वापरातून चाळीसगाव येथील ‌‘निरंतरा‌’ या पर्यटन स्थळातील बांधकामाचे सादरीकरण इंजिनियर मिलिंद कुलकणी व त्यांच्या सहकारी आर्किटेक्ट विनिता मंडोले यांनी केले. या परिषदेत अमेरिकेचे डॉ. ॲन्तोनी नामन, तसेच अर्जुन दोषी, आर्किटेक्ट मनिष बँकर यांनीही फेरोसिमेंट संबंधी विचार मांडले. परिषदेच्या समारोपात आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स, अभ्यासक आणि विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली.

 

चौकट:

 

फेरोसिमेंट विषयाचा अभ्यासक्रमात समावेश

 

फेरोसिमेंट तंत्रज्ञानाचा समावेश आर्किटेक्चर अभ्यासक्रमात लवकरच करण्यात येणार असल्याचे, सीओएचे अध्यक्ष अभय पुरोहित यांनी सांगितले.ते म्हणाले की, हा अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी पूरक आहे. स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातही या तंत्रज्ञानासाठी खूप काही करता येईल. फेरोसिमेंटसह अन्य विषयांवरील प्रगत संशोधनासाठी ‌‘सेंटर ऑफ एक्सिलन्स‌’ या संस्थेची स्थापना बंगलोरमध्ये ‌‘सीओए‌’च्या नियोजित कार्यालय परिसरात करण्यात येत आहे. डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धीमत्तेचा फेरोसिमेंटच्या उपयुक्तेसाठीच्या संशोधनात खूप उपयोग होणार आहे. फेरोसिमेंट तंत्रज्ञानातील अधिक संशोधनासाठी केंद्र सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय तसेच विविध उद्योगांच्या आर्थिक सहकार्यातून हे का

र्य पुढे जाऊ शकेल.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments