शाश्वत आणि सुरक्षित उपायांच्या माध्यमातून ग्राहकांप्रतीची वचनबद्धता सिद्ध करते
भारत, 19th सप्टेंबर 2025: लॉकर्ससाठी प्रतिष्ठित ग्रीनप्रो प्रमाणपत्र प्राप्त करणारी भौतिक सुरक्षा उद्योगातील पहिलीच कंपनी ठरल्याचे गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या सिक्युरिटी सोल्युशन्स व्यवसायाने आज जाहीर केले. पर्यावरणाबाबत जागरूक ग्राहकांच्या विकसित होत असलेल्या अपेक्षा पूर्ण करणारा हा महत्त्वाचा टप्पा आहेच, त्यासोबतच तो पर्यावरण-जागरूक, उच्च-सुरक्षा उपाय देण्याच्या ब्रँडच्या खोल वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करतो. उत्पादनाच्या टिकाऊपणाबाबत डिझाइनपासूनच विचार करण्यास सुरुवात होते. तसेच प्रत्यक्षातील उत्पादन, पुरवठा साखळी आणि उत्पादने परत आल्यास त्याची विल्हेवाट कशी लावायची, या सगळ्याचा विचारही त्यात होतो. थोडक्यात, आपल्या ग्राहकांना सुरक्षितता आणि टिकाऊपणा यातील एकाची निवड करावी लागणार नाही, याची काळजी कंपनी घेते.
खरेदी धोरण, अक्षय्य ऊर्जेचा वापर आणि पाण्याचा पुनर्वापर यासारख्या उत्पादन प्रक्रिया, प्रमाणित पर्यावरणपूरक विक्रेत्यांकडून घेतलेले साहित्य, पर्यावरणपूरक पॅकेजिंग, पुनर्वापरक्षमता आणि वापर संपल्यानंतरचे उत्पादनाचे व्यवस्थापन या सगळ्याचा किती विचार केला आहे, ते पाहून ग्रीनप्रो प्रमाणपत्र दिले जाते. श्रेणी अंतर्गत परिभाषित केलेल्या कार्बन उत्सर्जन निकषांची सातत्याने पूर्तता होते आहे की नाही याची खात्री करून या प्रमाणपत्राचे दर दोन वर्षांनी नूतनीकरण केले जाते.
गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या सिक्युरिटी सोल्युशन्स व्यवसायाचे व्यवसाय प्रमुख श्री. पुष्कर गोखले म्हणाले, “टिकाऊपणा ही आमच्या व्यवसायाची केवळ एक जबाबदारी नाही तर ते आमच्या व्यवसायाचे मूळ आहे. सध्या आमचे 36% उत्पन्न गुड अँड ग्रीन उत्पादनांमधून येते. 2030 पर्यंत तेच 50% पर्यंत वाढवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आम्ही आमच्या प्रमुख महसूल-निर्मिती उत्पादनांसह हे उद्दिष्ट कसे पूर्ण करत आहोत, हे आम्हाला मिळालेल्या ग्रीनप्रो प्रमाणपत्रातून समोर येते. उत्पादन डिझाइनपासून ते प्रत्यक्ष उत्पादन आणि पुरवठा साखळीपर्यंत टिकाऊपणाचा विचार करून, आम्ही केवळ पर्यावरणावरील परिणाम कमी करत नाही, तर आमच्या भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्मिती देखील सुनिश्चित करत आहोत.”
हे प्रमाणपत्र मिळावे म्हणून सिक्युरिटी सोल्युशन्स व्यवसायाने अनेक पद्धतींचा अवलंब केला आहे. उत्पादनाच्या बाबतीत विचार करायचा तर कंपनीची इको व्हिजन आणि ग्रीन पॉलिसीला अनुसरून उत्पादनाची रचना केली आहे. यासोबतच उत्पादन व्यवस्थापन आणि उत्पादन निर्मितीपासून ते त्याच्या नष्ट होण्यापर्यंतचा विचार यात करण्यात आला आहे. कंपनीने उच्च ऊर्जा-केंद्रित अडथळ्यांपासून पर्यावरणपूरक पर्यायांकडे संक्रमण केले आहे. त्यांच्या कारखान्यांमध्ये ऊर्जा कार्यक्षमता, पाणी संवर्धन, हरित गृह वायू उत्सर्जन कमी करणे, कचरा व्यवस्थापन, साहित्य संवर्धन आणि पुनर्वापर यासाठी उपाययोजना राबवल्या आहेत. यासोबतच हरित पुरवठा साखळी चालू ठेवणे, पर्यावरणीय नवोपक्रमांना चालना देणे आणि हरित पायाभूत सुविधा तसेच पर्यावरणीय उपक्रमांचा अवलंब करणे यासाठी उपाययोजना राबवल्या आहेत.
कंपनीचे स्ट्राँग रूम डोअर्स (क्लास सी आणि बी), हाय सिक्युरिटी क्लास ए सेफ्स, होम लॉकर्स आणि सेफ डिपॉझिट लॉकर कॅबिनेट यासारख्या उत्पादनांना ग्रीनप्रो प्रमाणपत्र देण्यात आले आहे. सुरक्षा उद्योगातील नवोपक्रमात गोदरेज अग्रेसर आहे. अशा प्रत्येक महत्त्वपूर्ण टप्प्यासह, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी, अधिक पर्यावरण पूरक, अधिक शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी कंपनी आपली वचनबद्धता दृढ करते.


