Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedअॅमेझॉन एमएक्स प्लेयरतर्फे सिक्सरच्या सीझन 2 चा ट्रेलर प्रदर्शित, रंगणार क्रिकेट, दुष्मनी...

अॅमेझॉन एमएक्स प्लेयरतर्फे सिक्सरच्या सीझन 2 चा ट्रेलर प्रदर्शित, रंगणार क्रिकेट, दुष्मनी आणि दिलासा यांचा अनोखा खेळ!

द व्हायरल फीव्हरतर्फे सिक्सरचा दुसरा सीझन 24 सप्टेंबरपासून अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर मोफत स्ट्रीम होणार

 

अॅमेझॉन एमएक्स प्लेयर या अॅमेझॉनच्या मोफत व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवेने सिक्सर सीरीजच्या बहुप्रतीक्षीत दुसऱ्या सीझनचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित केला. क्रिकेटवर आधारित आणि संपूर्ण भारतात लोकप्रिय झालेली ही सीरीज दुसऱ्या सीझनमधून जोरदार पुनरागमन करत आहे. पहिल्या सीझनच्या यशानंतर दुसऱ्या सीझनमध्ये यातले प्रचंड गुणवत्ता आणि काही दोषही असलेल्या क्रिकेटर्सचा पुढचा प्रवास पाहायला मिळणार आहे. वैयक्तिक आयुष्य, नव्याने आलेल्या जबाबदाऱ्या आणि प्रेम व मैत्रीच्या नात्यांची गुंतागुंत यातून ते कसा मार्ग काढतात हे यात पाहायला मिळणार आहे.

 

ट्रेलरवरून हा सीझन उत्साहवर्धक, भावनाप्रधान आणि जुनी दुष्मनी मैत्रीत बदलताना दाखवणार असून त्याचबरोबर नात्यांची परीक्षा होईल, प्रेम व निष्ठा अनपेक्षितपणे पणाला लागेल. क्रिकेटमधल्या विजयाच्या पलीकडे जात सिक्सरच्या दुसऱ्या सीझनमध्ये दुसऱ्यांदा मिळणारी संधी, स्वतःचा शोध आणि आपला मार्ग धुंडाळण्याचं साहस यांची कहाणी उलगडणार आहे. द व्हायरल फीव्हरची (टीटीएफ) निर्मिती व चैतन्य कुंभकोणम व दिव्यांशू मल्होत्रा यांचं दिग्दर्शन असलेल्या सिक्सर सीझन 2 मधे गुणवान कलाकार झळकणार आहेत. त्यात शिवांकित सिंग परिहार, करिष्मा सिंग, गौरव सिंग, बद्री चव्हाण, आनंदेश्वर द्विवेदी, ब्रिजभूषण शुक्ला व राहुल तेवारी यांचा समावेश असेल.

 

अॅमेझॉन एमएक्सप्लेयरच्या कंटेंट विभागाचे प्रमुख अमोघ दुसाद म्हणाले, ‘अॅमेझॉन एमएक्स प्लेयरतर्फे भारतातल्या प्रेक्षकांना आपल्याशा वाटतील अशा गोष्टी सांगण्यावर भर दिला जातो. सिक्सर ही अशाच प्रकारची गोष्ट आहे. क्रिकेट हा फक्त खेळ नाहीये, तर तो आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. सीझन 2 मधे पिचच्या पलीकडे जात मैत्री, दिलासा व स्वतःवरचा विश्वास या पैलूंवर आधारित गोष्ट पाहायला मिळणार आहे.’

 

सीरीजमध्ये निक्कूची भूमिका साकारणारे शिवांकित सिंग परिहार म्हणाले, ‘परत एकदा निक्कूची भूमिका साकारणं माझ्यासाठी घरी परतण्यासारखा जिव्हाळा देणारं होतं. पहिल्या सीझनमध्ये तो तसा उथळ, प्रसिद्धीच्या मागे धावणारा दाखवण्यात आला आहे. या सीझनमधे तो खेळाबरोबरच लोकांची किंमत करताना दिसेल. सिक्सरच्या दुसऱ्या सीझनमध्ये दुसरी संधी, एकीची भावना आणि आपली निवडच कशी आपल्या आयुष्याला दिशा देत असते हे पाहायला मिळणार आहे.’

 

गार्गीची भूमिका साकारणाऱ्या करिष्मा सिंग म्हणाल्या, ‘दुसऱ्या सीझनची मला आवडलेली गोष्ट म्हणजे, नात्यांचा अस्सलपणा. गार्गी प्रेमत्रिकोणात अडकलेली असले, तरी तिच्यामुळे गोष्ट भावनिक पातळीवर ठेहराव घेते आणि कथेला वेगळी उंची देते. सिक्सरच्या दुसऱ्या सीझनमध्ये क्रिकेट म्हणजे फक्त सामने आणि स्कोअर नसतो, तर प्रेम, निष्ठा आणि चुकतमाकत पण सुंदर रीतीनं केलेली प्रगती असते हे दाखवण्यात आलं आहे. या सीरीजची गोष्ट मनाला थेड भिडणारी, वास्तववादी आणि आपलीशी वाटणारी आहे.’

 

टीव्हीएफचे अध्यक्ष विजय कोशी म्हणाले, ‘सिक्सरच्या दुसऱ्या सीझनमधे आम्हाला क्रिकेटचं खरं स्पिरीट दाखवण्याबरोबरच प्रत्येकाला आणि सगळ्यांनाच आपलीशी वाटेल अशी गोष्ट सांगायची होती. निक्कूचा प्रवास हा फक्त खेळापुरता मर्यादित नाही, तर त्याला मैत्री, दुष्मनी आणि नव्यानं मिळणारी दुसरी संधी अशा विविध पैलूंची जोड मिळालेली आहे. सिक्सरच्या लाखो चाहत्यांसाठी ही भावनिक आणि तितकीच उत्साहवर्धक गोष्ट समोर आणताना आम्हाला आनंद होत आहे.’

 

सिक्सरचा दुसरा सीझन 24 सप्टेंबरपासून अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर, एमएक्स प्लेयर अ‍ॅपद्वारे मोबाइल आणि कनेक्टेड टीव्हीवर, अॅमेझॉन शॉपिंग अ‍ॅप, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही, एयरटेल एक्स्ट्रीमवर पाहाता

येणार आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments