Friday, October 23, 2026
Google search engine
HomeUncategorized१०१ प्रचारकांच्या जीवन कथांचा "समिधा" ग्रंथ प्रकाशित

१०१ प्रचारकांच्या जीवन कथांचा “समिधा” ग्रंथ प्रकाशित

 

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या औचित्याने

१०१ निवडक प्रचारकांच्या

त्यागमय जीवनाच्या कथा असलेला “समिधा” हा ग्रंथ

श्री राम जन्मभूमी न्यास चे कोशाध्यक्ष पूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्याहस्ते नुकताच मुंबईत प्रकाशित करण्यात आला.

 

यावेळी बोलताना स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज म्हणाले की, मातृभूमीची आस

असणाऱ्या प्रत्येकास भावणाऱ्या या ग्रंथात प्रचारकांचे संपूर्ण जीवन नाहीय तर त्यांच्या जीवनाची नुसती झलक आहे. राम मंदिर आणि राष्ट्राच्या उभारणीत अमूल्य योगदान असलेल्या सर्व प्रचारकांना आपण वंदन करतो. संन्यासांना तरी त्यांच्या भगव्या कपड्यांमुळे आपसुकच मान,सन्मान मिळतो. पण हे प्रचारक संन्यासापेक्षा अधिक जास्त सन्यासी होते.ते प्रण्यासी झाले होते. अशा प्रचारकांचे जीवन लोकांपुढे आले पाहिजे,असे आपल्याला खूप वर्षांपासून वाटत होते,ते काम आज पूर्ण झाले असे सांगून त्यांनी प्रचाराकांना कशा कठीण परिस्थितीत काम करीत रहावे लागले हे सोदाहरण सांगितले.

 

आजपर्यंत विवेक प्रकाशनाने ३५० पुस्तके प्रकाशित केली असली तरी “समिधा” हा ग्रंथ

विवेक प्रकाशनाचा मुकुटमणी ठरेल असा विश्वास कौशल्य विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

 

विवेक प्रकाशनाचे संपादक

श्री रविंद्र गोळे यांनी

विवेक प्रकाशनाच्या ७७ वर्षांच्या वाटचालीचा नेमकेपणाने आढावा घेऊन “समिधा “ची माहिती दिली.

 

यावेळी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते समिधा ची संकल्पना सुचविणारे ,अमेरिका स्थित जेष्ठ अभियंते तथा स्वयंसेवक

श्री विनोद बापट आणि ग्रंथातील रेखाचित्रे साकारणाऱ्या कुमारी तन्वी नांगुडे यांचा सत्कार करण्यात आला.

 

प्रारंभी हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री रमेश पतंगे यांनी सर्व मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रतीक कडू यांनी त्यांच्या भरदार आवाजात संघ गीत सादर केले. निवेदिता सावंत यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन सौ शीतल खोंड यांनी केले.

 

या कार्यक्रमास संघ परिवाराच्या विविध संघटनांचे

प्रतिनिधी,ज्येष्ठ पटकथा लेखक दिग्दर्शक श्री प्रदीप दीक्षित,रामायण फेम कॅमेरामन श्री अजित नाईक, दूरदर्शनच्या जेष्ठ निर्मात्या मीना गोखले, अँड.पानसरे,

निवृत्त माहिती संचालक

श्री देवेंद्र भुजबळ,न्यूज स्टोरी टुडे च्या निर्मात्या सौ अलका भुजबळ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments