‘डब्ल्यू’ स्टोअर्समध्ये लक्झरी ब्रँड म्हणून ‘विशफुल’चे पदार्पण, ज्यामध्ये उत्सव, विवाह सोहळा आणि खास प्रसंगांसाठी अत्याधुनिकता व आकर्षकतेचे संयोजन आहे.
आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लि. (एबीएफआरएल) या भारतातील फॅशन क्षेत्रामधील आघाडीच्या कंपनीने ‘विशफुल’च्या लाँचसह प्रीमियम ओकेजन वेअर श्रेणीमध्ये प्रवेशााची घोषणा केली आहे. भारतातील आधुनिक महिलांसाठी डिझाइन करण्यात आलेला ब्रँड विशफुल नवीन आकर्षकतेसह अद्वितीयरित्या निर्माण केलेली डिझाइन देतो, तसेच प्रत्येक साजरीकरणासाठी अत्याधुनिक लक्झरीचे प्रतीक असलेले पोशाख देतो. सध्या डब्ल्यू स्टोअर्समध्ये प्रदर्शित करण्यात आलेला विशफुल सहजसाध्य लक्झरी ब्रँड म्हणून स्थित आहे, जो उत्सव कार्यक्रम, विवाह सोहळा आणि खास प्रसंगी आत्मविश्वासू, आकर्षक व स्टायलिश दिसण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी डिझाइन करण्यात आला आहे.
या लाँचबाबत मत व्यक्त करत आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लि.च्या टीसीएनएस विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत डागा म्हणाले, ”विशफुलच्या लाँचसह आम्ही प्रीमियम ओकेजन वेअरमध्ये नवीन मापदंड स्थापित करत आहोत. ब्रँड अद्वितीयरित्या डिझाइन केलेल्या कुशलतेसह आजचे ग्राहक शोध घेत असलेली सुलभता देतो. आमचा महिलांना आत्मविश्वास व मोहकतेसह जीवनातील क्षणांना साजरे करण्यास सक्षम करण्याचा दृष्टिकोन आहे, जेथे कलेक्शनमधून विचारशील लक्झरी आणि तडजोड न करता येणारा दर्जा दिसून येतो. हे फक्त आणखी एका ब्रँडचे लॉच नाही तर आम्ही विमेन्स ओकेजन-वेअरमधील आमचे नेतृत्व अधिक दृढ करत आहोत, तसेच भारतातील फॅशन क्षेत्राच्या भविष्याला आकार देत आहोत.”
सुधारित, पण आधुनिक संवेदनशीलतांमध्ये सामावलेला विशफुल सुसज्ज, सामाजिक स्तरावर सक्रिय आणि प्रभावीपणे स्टायलिश असलेल्या महिलांच्या गरजांची पूर्तता करतो. हे पदार्पणीय कलेक्शन प्रत्येक उत्साही मूडला कॅप्चर करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. ब्रंच व आकर्षक मेळाव्यांसाठी नाजूक भरतकाम असलेल्या फ्लुइड फॅब्रिक्समधील उत्साही डे प्रीमियम सिल्हूटपासून ते कॉकटेल गाऊन, भरतकाम केलेले जॅकेट सेट आणि ज्वेल टोनमध्ये शिल्पित ड्रेप्स असलेले ग्लॅमरस पार्टी वेअरपर्यंत हे कलेक्शन उत्सवी वॉर्डरोबमध्ये विविधतेची भर करते. लाइट फेस्टिव्ह एडिटमध्ये चंदेरी आणि जॅकवर्ड एन्सेम्बल्ससह परंपरा दिसून येते, जे हळदी, मेहंदी किंवा कौटुंबिक उत्सवांसाठी योग्य आहेत. हेवी फेस्टिव्ह लाइनमध्ये स्टेटमेंट लेहेंगा आणि दागिन्यांपासून प्रेरित हस्तकला असलेल्या गुंतागूंतीच्या अनारकली यांसह उत्सवी पोशाखांचा समावेश आहे. तसेच वेडिंग कलेक्शन बनारसी जॅकवर्ड, आकर्षक लेहेंगा आणि वारसा-प्रेरित अनारकल्यांसह वारसा अभिजाततेला नव्या उंचीवर घेऊन जाते, जे वधू आणि लग्नापूर्वीच्या प्रसंगांची भव्यता टिपणाऱ्या कलात्मक हस्तकलेसह सजलेले आहे.
विशफुलच्या लाँचसह एबीएफआरएल आपला एथनिक वेअर पोर्टफोलिओ अधिक दृढ करत आहे, जेथे विमेन्स फॅशन ब्रँड्सच्या श्रेणीमध्ये नवीन आकाराची भर करत आहे. विशफुलमधून वैविध्यपूर्ण ब्रँड्स डिझाइन करण्याचे ग्रुपचे धोरण दिसून येते, जे विशेषत: प्रीमियम ओकेजन-वेअर क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या सर्वसमावेशक महत्त्वाकांक्षांची पूर्तता करते. सर्वोत्तम आकर्षकतेसह सुलभतेला एकत्र करत ब्रँड वारसा-प्रेरित फॅशन आणि दैनंदिन सेलिब्रेशन वेअरमधील तफावत दूर करतो, भारतातील आधुनिक महिलांसाठी लक्झरी महत्त्वाकांक्षी व सहजसाध्य बनवतो.
विशफुल भारतभरातील निवडक डब्ल्यू स्टोअर्समध्ये उपलब्ध असेल, जेथे समर्पित शॉप-इन-शॉप्स परिपूर्ण श्रेणी दाखवतील, प्रीमियम रिटेल अनुभव देतील, ब्रँड ऑनलाइन www.wishfulbyw.com आणि www.wforwoman.com येथे देखील उपलब्ध असे
ल.


