Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedॲबॉटचा 'प्रोजेक्‍ट क्षीरसागर' भारतातील दुग्‍ध उत्‍पादकांना सक्षम करण्‍यासोबत स्‍थानिक दूध पुरवठ्याला साह्य...

ॲबॉटचा ‘प्रोजेक्‍ट क्षीरसागर’ भारतातील दुग्‍ध उत्‍पादकांना सक्षम करण्‍यासोबत स्‍थानिक दूध पुरवठ्याला साह्य करत आहे

मुंबई, भारत, सप्‍टेंबर २५, २०२५ – उत्तम पोषणाची सुरूवात दर्जेदार घटकांसह होते. भारतातील पौष्टिक उत्‍पादनांसाठी वाढत्‍या मागणीची पूर्तता करण्‍यासाठी ॲबॉट या जागतिक हेल्‍थकेअर कंपनीला उच्‍च दर्जाच्‍या दूधाच्‍या विश्‍वासार्ह पुरवठ्याची गरज होती. म्हणून २०२२ मध्‍ये ॲबॉटने आंतरराष्‍ट्रीय ना-नफा तत्त्वावर आधारित संस्‍था टेक्‍नोसर्व्‍हसोबत सहयोग करत भारतात शेअर्ड-व्‍हॅल्‍यू उपक्रम ‘प्रोजेक्‍ट क्षीरसागर’ लाँच केला, जो दुग्‍ध उत्‍पादकांना मदत करण्‍याप्रती कटिबद्ध आहे. या उपक्रमाचा उत्‍पादकांच्‍या जीवनाला कलाटणी देण्‍याचा आणि त्‍यांना देशामध्‍ये शाश्‍वत कच्‍चा दूध पुरवठा साखळी निर्माण करण्‍यास सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे. आज, ॲबॉट सांगत आहे की या उपक्रमाने भारतातील उत्‍पादक व कुटुंबांच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे, जे अॅबॉटच्‍या पौष्टिक उत्‍पादनांवर अवलंबून आहेत.

 

महाराष्‍ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्‍ये लाँच करण्‍यात आलेला प्रोजेक्‍ट क्षीरसागर उत्‍पादकांमध्‍ये गुंतवणूक करत त्‍यांना बॅक खाती उघडण्‍यास, रोजगार संधींचा फायदा घेण्‍यास आणि त्‍यांचा व्‍यवसाय विकसित करण्‍यासाठी आर्थिक साक्षरता व डेअरी फार्म व्‍यवस्‍थापनाच्‍या सर्वोत्तम पद्धतींमध्‍ये प्रशिक्षण घेण्‍यास मदत करतो. हा प्रोजेक्‍ट भारतातील दुग्‍ध उत्‍पादकांना साह्य करण्‍यासाठी दशकापूर्वी अंमलबजावणी करण्‍यात आलेल्‍या सुरूवातीच्‍या प्रकल्‍पांमधून डिझाइन करण्‍यात आला आहे.

 

ॲबॉट व टेक्‍नोसर्व्‍ह दूध उत्‍पादन वाढवण्‍यासाठी शेतकऱ्यांसोबत सहयोगाने काम करतात आणि त्यांना पौष्टिक पशुखाद्य पुरवण्यासाठी आणि पशुपालन पद्धती सुधारण्यासाठी मार्गदर्शन करतात. या उपक्रमाने विश्‍वसनीय कोल्‍ड स्‍टोरेजसाठी १३० गाव-आधारित दूध संकलन केंद्रे स्‍थापित केली आहे, ज्‍यामुळे उत्‍पादकांना दर्जेदार दूध वितरित करण्‍यास सोपे जाते आणि त्‍यांचे उत्‍पन्‍न वाढते.

 

”या उपक्रमाचा स्‍थानिक उत्‍पादक समुदाय, तसेच कुटुंबांना फायदा होतो, जे ॲबॉटच्‍या पौष्टिक उत्‍पादनांवर अवलंबून आहेत,” असे टेक्‍नोसर्व्‍ह इंडियाचे कंट्री डायरेक्‍टर जॉयदीप दत्ता म्‍हणाले. ”प्रमाणीकृत डेअरी पद्धतींचा अवलंब करत भारतातील उत्‍पादकांनी दूध दर्जा व उत्‍पादकता सुधारली आहे, तसेच त्‍यांचे उत्‍पन्‍न वाढत आहे आणि बहुमूल्‍य ज्ञान मिळवत आहे.”

 

आतापर्यंत, ॲबॉटने १२,००० हून अधिक दुग्‍ध उत्‍पादकांना सामील केले आहे, अधिक शाश्‍वत पुरवठा साखळी निर्माण करत आहे. या प्रोजेक्‍टचा सर्वोत्तम पद्धतींची अंमलबजावणी करत, अॅण्‍टीबायोटिक वापर कमी करत आणि ४,००० हून अधिक फार्म्‍समध्‍ये पशुंची काळजी घेण्‍याचा दर्जा सुधारत जवळपास ५१,००० दुग्‍ध पशुंना फायदा देण्‍याचा मनसुबा आहे. या उपक्रमाने पशुवैद्यकीय खर्चात ६० टक्‍के कपात केली आहे अणि दूध उत्‍पादन प्रकल्‍पादरम्‍यान ५५ टक्‍क्‍यांनी वाढवत आहे.

 

”प्रोजेक्‍ट क्षीरसागर शाश्‍वत व कच्‍चा दूध पुरवठा साखळी निर्माण करण्‍यासाठी ॲबॉटच्‍या जागतिक प्रयत्‍नांचा भाग आहे,” असे ॲबॉटच्‍या भारतातील पोषण व्‍यवसायासाठी पुरवठा साखळीचे संचालक शिबाशिष प्रामाणिक म्‍हणाले. ”हा उपक्रम कौटुंबिक व्‍यवसायांना यशस्‍वी होण्‍यास मदत करतो आणि भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करतो. तसेच हा उपक्रम ॲबॉटला आमच्‍या पोषण उत्‍पादनांसाठी स्‍थानिक पातळीवर उच्‍च दर्जाच्‍या दूधाचा पुरवठा करण्‍यास मदत करतो. आम्‍हाला उपक्रमामधील उत्‍पादकांकडून ६० टक्‍के दूध पावडरचा स्रोत मिळण्‍याची अपेक्षा आहे, ज्‍यामुळे आमच्‍या पोषण व्‍यवसायाला आणि आमच्‍या उत्‍पादनांवर अवलंबून असलेल्‍या कुटुंबांना खरे मूल्‍य मिळेल.”

 

हा उपक्रम भारतात शाश्‍वत व स्थिर डेअरी पुरवठा साखळी निर्माण करण्‍यामध्‍ये प्रमुख पाऊल आहे. धोरणात्‍मक सहयोग, शिक्षण आणि लक्ष्यित गुंतवणूकीच्‍या माध्‍यमातून अॅबॉट उदरनिर्वाह सुधारत आहे, तसेच भारतात कृषी परिसंस्‍थेला चालना देत आहे, ज्‍यामुळे शेतकरी, पशु व ग्राहकांना

फायदा होतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments