पुणे,25 सप्टेंबर 2025 : सिंजेंटा तर्फे पुण्यात नुकतेच कृषी क्षेत्रावर आधारित डेवकॉन 2025 परिषद संपन्न झाली. या परिषदेत सिंजेंटाने अद्ययावत एआय चलित सोल्युशन्सच्या शृंखलेची घोषणा केली. या परिषदेमध्ये 200 हून अधिक डेव्हलपर्स,अभियंते व तंत्रज्ञान नेतृत्वाने सहभाग घेतला. सिंजेंटाचे एआय उपक्रम हे उपग्रह प्रतिमा विश्लेषणाद्वारे अचूक शेती ,रोग व कीटक व्यवस्थापनासाठी प्रेडिक्टीव्ह मॉडेलिंग व पाण्याचा वापर अनुकूल करणाऱ्या इंटेलिजंट सिंचन प्रणालीवर आधारित आहे.हे नवोपक्रम भारतातील कृषी क्षेत्रासमोरील विविध आव्हाने समोर ठेऊन तयार करण्यात आली आहेत.


