पुणे,29 सप्टेंबर 2025 : नवरात्रीनिमित्त नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर तर्फे महिला सक्षमीकरणावर एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.वुमन ॲज चेंजमेकर्स – लीडरशिप,लिगसी ॲन्ड लिबरायझेशन ही या कार्यक्रमाची संकल्पना होती.
पोलिस उपायुक्त नम्रता पाटील,रूरल रिलेशन्सचे संस्थापक प्रदीप लोखंडे,ममता बाल सदनच्या संचालिका नम्रता सकपाळ,पुला (पुणे लेडिज) समूहाच्या संस्थापिका सोनिया काँजेटी,रोटरी क्लब ऑफ पुणे रिव्हरसाईडच्या अध्यक्ष प्रेरणा प्रियदर्शिनी संग्राम गायकवाड, नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने,संचालक डॉ.दिविज माने,समूह कार्यकारी अधिकारी डॉ.संजय पठारे आदी मान्यवर उपस्थित होते. आर जे बंड्या हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
नम्रता पाटील म्हणाल्या की,महिलांनी आपले निर्णय स्वत:च घेतले पाहिजेत आणि तेच तिचे सक्षमीकरण असेल.सक्षमीकरणाची भावना इतरांना आणि विशेष करून गरजूंना सक्षम बनविण्यामधून येते.पोलिस दलात समाविष्ट झाल्यावर मी हे करू शकले.
नम्रता सकपाळ म्हणाल्या की, महिलांना आपल्या मनातील आवाज ऐकता आला पाहिजे आणि त्यानंतरच आपली क्षमता आपल्या कळू शकेल.
सोनिया काँजेटी म्हणाल्या की,सक्षमीकरण म्हणजे सर्वांना समान संधी उपलब्ध हव्यात, त्याचबरोबर आर्थिक आणि भावनिक स्वातंत्र्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे.हे करत असताना कुटुंबियातील पुरूषांकडून समर्थन मिळाल्यास प्रवास अधिक सुखकर होतो.
प्रेरणा प्रियदर्शिनी संग्राम गायकवाड म्हणाल्या की, सक्षमीकरण म्हणजे एकमेकांना साथ देत घडवणे.भारताचा विकास होत असताना भविष्यात पुढे जाण्यासाठी महिलांना समर्पण हवे.
प्रदीप लोखंडे म्हणाले की,महिला त्या परिवर्तनकारी असतात.भारतातील ग्रामपंचायतींमध्ये गेल्या काही वर्षात झालेल्या बदलांचा दाखला देत ते म्हणाले की,भारतात अनेक सकारात्मक बदल होत आहेत.
नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की,अधिक समावेशक भविष्य घडविण्यामध्ये महिलांच्या भूमिकेवर प्रकाश टाकणे व जास्तीत जास्त महिलांना कसे सर्मथन देता येईल हा या विचारप्रवर्तक कार्यक्रमाचा
उद्देश होता.


