Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतीय शास्त्रीय संगीत हे केवळ कौशल्य नसून पूर्णत्वाकडे जाणारी कला आहे ‌‘इन्क्लॅम‌’...

भारतीय शास्त्रीय संगीत हे केवळ कौशल्य नसून पूर्णत्वाकडे जाणारी कला आहे ‌‘इन्क्लॅम‌’ तर्फे 67 रागांच्या लोकार्पण सोहळ्यात पं. विकास कशाळकरांचे गौरवोद्गार

पुणे, दि. २९ सप्टेंबर २०२५ : भारतीय शास्त्रीय संगीत हे केवळ कौशल्य नसून ती कला आहे. ही कला जेव्हा कौशल्याने मांडली जाते तेव्हाच तिला पूर्णत्व प्राप्त होते. त्या अर्थाने संगीतातील रागांमधील आलाप म्हणजे त्यातील कलेचा विचार आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ संगीताचार्य पं. विकास कशाळकर यांनी काढले. भारतीय शास्त्रीय संगीतासाठी काम करणाऱ्या ‌‘इन्क्लॅम‌’ तर्फे ‌‘शब्दांपलिकडच्या सुरांची साद‌’ हा 67 अनिबद्ध स्वरूपातील रागांचा लोकार्पण सोहळ्यात ते भारतीय राग व स्वर यांविषयीचे बोलत होते.

 

पं. कशाळकर, गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पं. प्रमोद मराठे आणि महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनचे (बीएनसीए) प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांच्या हस्ते या रागांच्या मूळ ध्वनीमुद्रणासह पेनड्राईव्हच्या स्वरूपात संगीतप्रेमी संस्था व रसिकांसाठी लोकार्पण करण्यात आले. यावेळी ‌‘इन्क्लॅम‌’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. राजेंद्र करंबेळकर, सृजनशील संचालक व संवादिनी वादक राजीव तांबे आणि गायिका अंकिता तांबे उपस्थित होते. या 67 पैकी निवडक रागांच्या लडी प्रसिद्ध गायिका अनुराधा कुबेर आणि श्रुती देशपांडे यांनी सादर केल्या. बीएनसीएतील कला आणि वास्तूरचनाशास्त्र आंतरविद्याशाखीय केंद्रप्रमूख व संगीतातील विद्यावाचस्पती प्रा. डॉ. संजीवनी पेंडसे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच ‌‘इन्क्लॅम‌’च्या प्रकल्पातील कलाकारांपैकी गायिका मेघना खंडकर, तसेच अमोद कुलकर्णी, हिमांशू तांबे, पंचम जोशी, भूषण पुराणिक यांचा प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली साळसकर यांनी केले.

 

‌‘इन्क्लॅम‌’च्या या प्रकल्पाचा गौरव करताना पं. कशाळकर म्हणाले की, रागांमध्ये स्वर, वर्ण व रंजन या सर्वांमधूनच तो सिद्ध होत असून त्यातील आलाप हे त्या गायकाने त्यासंबंधी स्वत: केलेल्या विचारांचेच अभिव्यक्त स्वरूप आहे. या प्रकल्पातील प्रत्येक राग हा त्यातील गायकाने स्वत:च्या विचारातून सादर केला असून त्यातील आलाप हेच त्यातील कलेचे गमक आहे. ऐकणाऱ्याने त्यामागचा विचार समजावून घेत व गाणाऱ्यानेही आपल्या स्वतंत्र विचारांनी तो मांडला पाहिजे. या प्रकल्पानंतर ‌‘इन्क्लॅम‌’ने संगीतातला पुढचा विचार मांडला पाहिजे.

 

पं. विष्णू दिगंबर पलुस्करांचे शास्त्रीय संगीतातील काम लक्षात घेता त्याचा प्रसार हा शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत ‌‘ऑन लाईन‌’ नेण्याचा प्रयत्न गांधर्व महाविद्यालय करत आहे, असे सांगून पं. मराठे म्हणाले की, हे काम केवळ ग्रामीण-शहरी नसून वैश्विक स्वरूपाचे आहे. ‌‘इन्क्लॅम‌’ ने यूट्यूबच्या माध्यमातून भारतीय राग प्रसारित करण्याचा फायदा जगभरातील संगीत अभ्यासकांसाठी करून दिला आहे. त्यातूनच आमच्यासारख्या संगीत शिकवणाऱ्या संस्थांना प्रेरणा मिळेल.

 

67 रागांच्या डॉ. करंबेळकर यांच्या प्रकल्पाचे कौतुक करताना डॉ. कश्यप म्हणाले की, ते पेशाने डॉक्टर असल्यामुळे आजच्या धावपळीच्या काळात त्यांनी संगीताची ही ‌‘कॅप्सूल‌’ तरुण पिढीसाठी तयार केली आहे. संगीताची ही भाषा डॉ. करंबेळकरांनी हेरली व तिचे ऋण या प्रकल्पातून सिद्ध केले. त्यातून मानवी जीवनातली पंचेंद्रिये समृद्ध होतील. तसेच त्यातून आपले जीवन केवळ संख्यात्मकतेपेक्षा गुणात्मकतेने परिपूर्ण करता येेईल.

 

प्रास्तविकात डॉ. करंबेळकरांनी 67 रागांच्या लोकार्पणामागची संकल्पना सांगितली. ते म्हणाले की, हा ‌‘इन्क्लॅम‌’ मध्ये सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचा हा प्रकल्प आहे. संगीत आणि अभिजात संगीत हे दोन्ही हा महासागर आहेत. या सागरातील मोत्यांना गवसणी घालणे हे जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते. या प्रकल्पात शब्द नसून ती एकप्रकारे शब्दांपलीकडची सुरांची भाषा त्यातून व्यक्त होणार आहे.

 

अंकिता तांबे म्हणाल्या की, केवळ आलापीतून राग व्यक्त करण्याच्या कल्पनेला मूर्त स्वरूप देणारे भारतीय शास्त्रीय संगीतातील हे निस्वार्थीपणे केलेले हे एक कायमस्वरूपाचे का

म झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments