Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedटोयोटा किर्लोस्‍कर मोटरने जागतिक पर्यावरण आरोग्‍य दिनानिमित्त शाश्वततेप्रती आपली कटिबद्धता दृढ केली 

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरने जागतिक पर्यावरण आरोग्‍य दिनानिमित्त शाश्वततेप्रती आपली कटिबद्धता दृढ केली 

 

बेंगळुरू, सप्‍टेंबर २५, २०२५: जागतिक पर्यावरण आरोग्‍य दिनाचे औचित्‍य साधून टोयोटा किर्लोस्‍कर मोटर (टीकेएम)ने आज भारतात पर्यावरणीय स्थिरता आणि सामाजिक स्‍वास्‍थ्‍याला चालना देण्‍याप्रती आपली दीर्घकालीन कटिबद्धता अधिक दृढ केली. २०१५ मध्‍ये घोषणा करण्‍यात आलेल्‍या जागतिक टोयोटा एन्‍व्‍हायरोन्‍मेंट चॅलेंज २०५० (टीईसी २०५०)मध्‍ये सहा आव्‍हानांचा समावेश आहे. टीईसी २०५० मधून मार्गदर्शन घेत टीकेएम आपले कार्बन उत्‍सर्जन कमी करत आहे, ज्‍यामुळे परिवर्तनाला गती मिळत आहे, ज्‍यासाठी ते उत्‍पादनांच्‍या पलीकडे जात आहेत, उत्‍पादन कार्यसंचालनांमध्‍ये आणि त्‍यांच्‍या संपूर्ण मूल्‍य साखळीमध्‍ये शाश्वत पद्धतींचा अवलंब करत आहेत. तसेच, अशा पर्यावरणासंबंधित प्रयत्‍नांमध्‍ये नैसर्गिक संसाधनांचे जतन आणि प्रभावी प्रकल्‍पांच्‍या माध्‍यमातून समुदायाची प्रगती यांचा समावेश आहे.

जागतिक पर्यावरण आरोग्‍य दिन पर्यावरणाचा दर्जा आणि सार्वजनिक आरोग्‍यामधील अपरिहार्य संबंधाची आठवण करून देतो. शुद्ध हवा व पाणी, प्रभावी कचरा व्‍यवस्‍थापन व प्रदूषण नियंत्रणाला चालना देत हा दिवस निदर्शनास आणतो की पर्यावरणाचे संरक्षण करणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे आणि या बाबीशी संलग्‍न राहत टीकेएमचे शाश्वतता उपक्रम उत्‍सर्जन कमी करण्‍यावर व संसाधनांचे जतन करण्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍यासोबत आरोग्‍यदायी समुदायांप्रती देखील योगदान देतात.

‘रिस्‍पेक्‍ट फॉर प्‍लॅनेट’ (पर्यावरणाचा आदर) या तत्त्वाशी बांधील राहत टीकेएमने आपला उत्‍पादन पोर्टफोलिओ, उत्‍पादन प्रक्रिया आणि समुदाय पोहोच उपक्रमांमध्‍ये नाविन्‍यता व विकासात्‍मक ध्‍येयांचा समावेश केला आहे, ज्‍यामधून सर्वोत्तम व मोठ्या प्रमाणात निष्‍पत्तींची खात्री मिळते.

 

प्रमुखांचे मत

आपले मत व्‍यक्‍त करत टोयोटा किर्लोस्‍कर मोटरचे कार्यकारी उपाध्‍यक्ष व संचालक श्री. बी. पद्मनाभ म्‍हणाले:

”टीकेएममध्‍ये शाश्वतता आमची कार्यसंचालन करण्‍याच्‍या, नाविन्‍यता आणण्‍याच्‍या आणि विकास करण्‍याच्‍या पद्धतींचा पाया आहे. गेल्‍या वर्षभरात आम्‍ही विविध पैलूंमध्‍ये निर्णायक प्रगती केली आहे, बिदादी कार्यसंचालनांमध्‍ये १०० टक्‍के नवीकरणीय ऊर्जा संपादित केली आहे, मूल्‍य साखळीमध्‍ये डिकार्बनायझेशनला चालना देत आहे आणि चक्रिय अर्थव्‍यवस्‍थेच्‍या दिशेने वाटचाल करत आहे. आमच्‍या प्रयत्‍नांच्‍या माध्‍यमातून, तसेच आमच्‍या दूरवर पोहोचणाऱ्या समुदाय उपक्रमांच्‍या माध्‍यमातून आम्‍ही लाखो व्‍यक्‍तींच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. आमचे सहयोगी, भागधारक व कर्मचाऱ्यांसोबत सहयोगाने आम्‍ही भारत व त्‍यापलीकडे शाश्वत भविष्‍याचा आराखडा निर्धारित करण्‍यामध्‍ये मदत करत आहोत.”

पर्यावरणपूरक उत्पादन आणि संसाधन व्यवस्थापन

बिदादी प्लांट येथे टीकेएम २०३५ पर्यंत उत्पादन कार्यसंचालनांमध्ये निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाकडे सातत्याने वाटचाल करत आहे, तसेच २०५० पर्यंत संपूर्ण मूल्य साखळीत निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्‍याप्रती कटिबद्ध आहे.

ठळक वैशिष्‍ट्ये पुढीलप्रमाणे:

नवीकरणीय ऊर्जा परिवर्तन: टीकेएमने समर्पित सौर आणि पवन ऊर्जा स्थापनेद्वारे जवळपास ५०.४ मेगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमतेपर्यंत १०० अक्‍के नवीकरणीय ग्रिड वीज प्राप्‍त केली आहे. या बदलामुळे दरवर्षी ८३००० टनांपेक्षा जास्त कार्बन डायऑक्‍साइड उत्‍सर्जन कमी होण्‍यास मदत झाली आहे, ज्याला ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञानाचा अवलंब करून पाठिंबा मिळाला आहे, परिणामत: दरवर्षी विशिष्‍ट ऊर्जेचा वापर कमी होत आहे.

जल व्यवस्थापन: उत्पादनासाठी ८९ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाण्याची आवश्यकता आता पुनर्वापर आणि पावसाच्या पाण्याचे संचयन यांद्वारे पूर्ण केली जाते. आमच्याकडे १८ पावसाचे पुनर्भरण खड्डे आहेत आणि एकत्रित ५१००० घनमीटर क्षमतेचे दोन पावसाचे पाणी साठवणारे तलाव आहेत. मेम्ब्रेन बायो रिअॅक्टर (एमबीआर) आणि रिव्हर्स ऑस्मोसिस (आरओ) तंत्रज्ञानाचा वापर करून जवळपास ६० टक्‍के सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते आणि प्रक्रिया केलेले पाणी उत्‍पादनासाठी वापरले जाते.

कचऱ्याचे प्रमाण: टीकेएमने त्यांच्या सर्व प्लांटमध्ये झीरो वेस्‍ट-टू-लँडफिल दर्जा प्राप्‍त केला आहे, ज्यांचा पुनर्वापर दर ९६ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. अंतर्गत कचऱ्याव्यतिरिक्‍त, कंपनी भारताच्‍या वेईकल स्‍क्रॅपेज पॉलिसीला पाठिंबा देते, ज्‍यासाठी एण्‍ड-ऑफ-लाइफ वेईकल्‍ससाठी अधिकृत रिसायकलिंग चॅनेल्‍स विकसित करत आहे, उत्‍पादनापासून ग्राहकांच्‍या वापरानंतर पुनर्वापरापर्यंत चक्रियतेला सक्षम करत आहे.

जैवविविधता आणि कार्बन सीक्‍वेस्‍ट्रेशन: टोयोटा ग्रीन वेव्ह प्रकल्पाद्वारे टीकेएमकडे ११२.४ एकरपेक्षा जास्त हरित जमिन आहे, ज्यामुळे ७९० हून अधिक प्रजातींच्या वनस्पती आणि ४१० हून अधिक प्रजातींच्या प्राण्यांसाठी अधिवास निर्माण झाला आहे. मियावाकी वृक्षारोपणांनी आधीच ८११८ टन कार्बन उत्‍सर्जन कमी केले आहे, जेथे पारंपारिक वृक्षारोपण पद्धतींच्या तुलनेत (८.४५ टन/एकर) प्रति एकर सुमारे ३०.८६ टन कार्बन उत्‍सर्जन कमी केले आहे.

२५ एकरचे इकोझोन अनुभवात्मक शिक्षण केंद्र पर्यावरणीय शिक्षणासाठी शक्तिशाली सामुदायिक व्यासपीठ म्हणून काम करत आहे, जे ४०,००० हून अधिक विद्यार्थ्यांना आणि भागधारकांना इको-चॅम्पियन बनण्यास सक्षम करत आहे.

मूल्य साखळीचे डीकार्बोनायझेशन

उत्पादनाव्‍यतिरिक्‍त टीकेएमने हरित पुरवठा साखळी उपक्रमांना मजबूत केले आहे, लपलेले जीवनचक्र उत्सर्जन कमी करण्यासाठी कडक पुरवठादार ईएसजी अनुपालन फ्रेमवर्क आणि हरित लॉजिस्टिक्स ऑपरेशन्स सादर केले आहेत. त्यांचे इको-डीलरशिप नेटवर्क ग्राहक टचपॉइण्‍ट्समध्‍ये शाश्वतता अधिक एकत्रित करतात, पर्यावरणीय परिणाम कमी करतात आणि भागधारकांचा अनुभव वाढवतात.

कार्बन-न्‍यूट्रल मार्गांचे सक्षमीकरण

कार्बन न्‍यूट्रॅलिटीप्रती बहुमार्गीय दृष्टिकोनांतर्गत टीकेएम इलेक्ट्रिफाईड तंत्रज्ञानांमध्‍ये, तसेच भारतातील अद्वितीय ऊर्जा क्षेत्रासाठी अनुकूल असलेल्‍या हायब्रिड इलेक्ट्रिक, प्‍लग-इन हायब्रिड इलेक्ट्रिक, फ्यूइल सेल इलेक्ट्रिक आणि बॅटरी इलेक्ट्रिक वेईकल्‍समध्‍ये गतीशीलता सोल्‍यूशन्‍स देत आहे. कंपनी इलेक्ट्रिकफाईड फ्लेक्‍स-फ्यूईल वेईकल्‍स (ईएफएफव्‍ही)ना देखील प्रगत करत आहे, सुधारित कार्यक्षमता व कमी उत्‍सर्जन देण्‍यासाठी भारताची जैवइंधन ध्‍येये व शक्तिशाली हायब्रिड यंत्रणांना एकत्र करत आहे. २०२३ दरम्‍यान टीकेएमने सर्वात प्रशंसित इनोव्‍हा हायक्रॉसवर आधारित इलेक्ट्रिफाइड फ्लेक्‍स फ्यूईल वेईकलचा प्रोटोटाइप लाँच केला आणि भारताच्‍या उच्‍च उत्‍सर्जन नियमांशी सुसंगत असण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. ज्‍यामुळे हा जगातील बीएस ६ (स्‍टेज २) इलेक्ट्रिफाइड फ्लेक्‍स फ्यूइल वेईकलचा पहिला प्रोटोटाइप आहे.

जून २०२५ मध्‍ये टीकेएमने मोठ्या प्रमाणात ग्रीन हायड्रोजन-आधारित एकीकृत ऊर्जा सोल्‍यूशन्‍स सहयोगाने विकसित करण्यासाठी बेंगळुरूमधील ओहमियम इंटरनॅशनलसोबत धोरणात्‍मक सामंजस्‍य करार (एमओयू) केला. या सहयोगामधून गतीशीलतेपलीकडे विकेंद्रीकृत ऊर्जा आणि शुद्ध ऊर्जा परिसंस्‍थांमध्‍ये हायड्रोजन मोठ्या प्रमाणात वापरण्‍याचा कंपनीचा उद्देश दिसून येतो. प्रमुख फोकस क्षेत्रांमध्‍ये मायक्रोग्रिड्स, डेटा सेंटर्स आणि स्थिर, कमी-कार्बन ऊर्जा सोल्‍यूशन्‍सची गरज असलेल्‍या दुर्गम ठिकाणांचा समावेश आहे. म्‍हणून, हा सहयोग देशासाठी हायड्रोजन-समर्थित भविष्‍य घडवण्‍याच्‍या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

इतर महत्त्वपूर्ण टप्‍पे आहेत – भारतातील टोयोटा मिराई एफसीईव्‍ही पायलट प्रकल्‍प, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्‍स (आयआयएससी) बेंगळुरू, इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्‍ह टेक्‍नॉलॉजी (आयएसएमए) यांसारख्‍या विविध भागधरकांसोबत सहयोगाने व्‍यवहार्यता अभ्‍यास आणि हायड्रोजन-समर्थित कमर्शियल वेईकल प्रोटोटाइप्‍ससाठी फ्यूइल सेल मॉड्यूल्‍सचा पुरवठा.

समुदाय-केंद्रित शाश्वतता

टीकेएमने धोरणात्‍मक सीएसआर उपक्रमांच्‍या माध्‍यमातून प्रचलित समुदाय गरजांची पूर्तता करत आपला सामाजिक प्रभाव अधिक दृढ केला आहे:

जल सुरक्षा: फेब्रुवारी २०२५ मध्ये टीकेएमने म्हैसूर जिल्ह्यात जलशुद्धीकरण युनिटचे उद्घाटन केले, ज्यामुळे जवळपास ३,९८,८७० व्‍यक्‍तींना प्रत्‍यक्ष शुद्ध पिण्याचे पाणी मिळाले. सहा-टप्प्यांचे शुद्धीकरण, रिअल-टाइम देखरेख आणि सौर बॅकअपसह हे युनिट समुदायांना एकत्रित प्रतितास ७,५०० लिटर पाणी देतात.

ग्रामीण परिवर्तन: वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (डब्‍ल्‍यूओटीआर) सोबत जानेवारी २०२५ मध्ये सुरू झालेल्या प्रोजेक्‍ट जीवन धाराच्‍या माध्‍यमातून टीकेएम नऊ गावांमध्ये ५,३२२ हेक्टर जमिनीवर पाणलोट व्यवस्थापन राबवत आहे, ज्यामुळे २,०६३ घरांमधील ११,०२६ व्‍यक्‍तींच्‍या जीवनात सकारात्मक परिणाम झाला आहे.

परिसंस्थेचे कायाकल्‍प: अब्बानकुप्पे तलाव दत्तक घेतल्‍यामुळे पाण्याची गुणवत्ता, जैवविविधता आणि मनोरंजन वाढले आहे, ज्याचा प्रत्‍यक्ष सहा गावांमधील ८,००० रहिवाशांना फायदा झाला आहे.

आरोग्यसेवा: मोबाइल क्लिनिक्‍स आणि टेलिमेडिसिनद्वारे अधिकाधिक आरोग्‍यसेवा वंचित समुदायांपर्यंत पोहोचवल्‍या जात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments