Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedडॉ. संजय रुणवाल यांच्या 'हाऊ टू लिव्ह लाईफ आफ्टर ५५/६० - एसबीओपी...

डॉ. संजय रुणवाल यांच्या ‘हाऊ टू लिव्ह लाईफ आफ्टर ५५/६० – एसबीओपी लिव्हिंग’ या पुरस्कार विजेत्या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचे जयपूर येथील ग्लोबल हॅपीनेस फोरममध्ये प्रकाशन

 

पुणे, ६ ऑक्टोबर २०२५ : संजय रुणवाल फांउंडेशनचे संस्थापक आणि लेखक डॉ. संजय रुणवाल यांच्या ‘हाऊ टू लिव्ह लाईफ आफ्टर ५५/६० – एसबीओपी लिव्हिंग’ (५५/६० के बाद जीवन कैसे जिएं? एसबीओपी लिविंग) या पुरस्कार विजेत्या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचे अनावरण नुकतेच जयपूर येथील ग्लोबल हॅपीनेस फोरममध्ये करण्यात आले. या पुस्तकाचे प्रकाशन वर्ल्ड हॅपीनेस फाऊंडेशन, यूएसएचे अध्यक्ष लुईस गॅलार्डो यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विविध विचारवंत, आरोग्य तज्ञ, ज्येष्ठ नागरिक, विद्यापीठातील विद्यार्थी आणि माध्यम सदस्य उपस्थित होते.

 

या कार्यक्रमात बोलताना, डॉ.रुणवाल यांनी एसबीओपी लिव्हिंगच्या परिवर्तनकारी तत्वज्ञानाबद्दल माहिती दिली.ते म्हणाले की, एसबीओपी लिव्हिंग हे पुस्तक ५५/६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना परिपूर्ण, उद्देशपूर्ण आणि आनंदी जीवन जगण्यासाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने हा माझा प्रयत्न आहे. रिटायर – रिवायर – रिफायर ही संकल्पना ज्येष्ठांच्या जीवनाकडे पाहण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती घडवून आणत आहे आणि त्यांना त्यांच्या सुवर्ण वर्षांचा अर्थ आणि आनंद पुन्हा शोधण्यात मदत करत आहे, यावर त्यांनी भर दिला.

 

आनंद आणि आपले जीवन सुधारण्यास एसबीओपी लिव्हिंग हे दिशादर्शक ठरू शकते. या पुस्तकामध्ये उद्दिष्ट असलेले व आपल्या सभोवतालच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पाडणारे व आनंददायी जीवन कसे जगावे हे या पुस्तकात सांगण्यात आले आहे. आपले वय हे एक भार नसून ही एक संधी आहे. एसबीओपीची तत्वे ही आपल्या संस्कृती आणि पारंपरिक ज्ञानात पण सापडतात आणि म्हणूनच सर्वांसाठी उपयुक्त ठरू शकतात.

 

डॉ.रुणवाल यांनी श्रोत्यांना पुस्तक वाचण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की,एसबीओपी लिव्हिंग हे पुस्तक हे तत्वज्ञान समजून घेण्यास, स्वतःशी जोडण्यात आणि ते जीवनात लागू करण्यात मदत करेल.एसबीओपी लिव्हिंगची हिंदी आवृत्ती आता खरेदीसाठी उपलब्ध असून ज्येष्ठ नागरिकांना आनंदी आणि अधिक अर्थपूर्ण जीवन स्वीकारण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकते.

Om

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments