पुणे:
भारतातील अग्रगण्य बालसाहित्य प्रकाशक कराडी टेल्स यांनी आपल्या नव्या चित्रपुस्तकाच्या माध्यमातून पुण्यात सणासुदीचा आनंद पसरवला. “टेन डेज टू दिवाळी” या पुस्तकाचे प्रकाशन रीडअबू लायब्ररी आणि कहानी किड्स लायब्ररी येथे रंगतदार पद्धतीने पार पडले. या वेळी लहान वाचक, पालक आणि शिक्षकांनी उत्साहात सहभागी होत मजेदार वाचन आणि कृती सत्रांचा आनंद घेतला.
भारती सिंग लिखित आणि अंबिका करंदीकर यांनी चित्रित केलेले “टेन डेज टू दिवाळी” हे पुस्तक दिवाळीपूर्वी घराघरात सुरू होणाऱ्या साफसफाई, तयारी आणि गडबडीतील आनंददायक आणि विनोदी प्रसंगांवर आधारित आहे.
कराडी टेल्सच्या पब्लिशिंग डायरेक्टर शोभा विश्वनाथ म्हणाल्या,
“ही कथा दिवाळीपूर्वी घरात होणाऱ्या तयारीचा सार्वत्रिक अनुभव सुंदररीत्या मांडते. या सगळ्या सणाच्या गडबडीतून मुलांना नियोजन आणि कामाचे व्यवस्थापन या गोष्टी हलक्या-फुलक्या पद्धतीने शिकवते — आणि हे प्रत्येक कुटुंबाला भावेल असं आहे.”
या कार्यक्रमाला निधी ठप्पर (Edunation Services), काजल छतिजा (Edudrone We Connect), वृषाली बर्बरे (Enlit Kids) आणि सोनल बेहर (Bright Beginners) यांसारख्या नामांकित शिक्षिका उपस्थित होत्या. त्यांनी या पुस्तकाच्या कथनशैलीचे, सांस्कृतिक संदर्भांचे आणि विनोदात्मक मांडणीचे कौतुक करत हे पुस्तक मुलं आणि पालक दोघांनाही भावेल असे मत व्यक्त केले.
“टेन डेज टू दिवाळी” हे पुस्तक सर्व प्रमुख पुस्तकविक्री केंद्रांमध्ये तसेच ऑनलाइन www.karaditales.com येथे उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या: www.karaditales.com