पुणे दि – १६ आक्टो –
‘जनतेच्या मतांच्या मौलीक हक्का संबंघि’ मविआ’ शिष्टमंडळ निवडणुक आयोगास भेटल्याच्या पार्श्वभूमिवर निवडणुक आयोगाची चपलाशी करण्याच्या नादात,
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर उपहासक पध्दतीने वक्तव्ये करून विरोधी पक्ष नेत्यांची खिल्ली उडवण्याचा केलेला निंद्य प्रयत्न ‘महाराष्ट्राच्या सुसंस्कृत नेतृत्वाच्या परंपरेला’ गालबोट लावणारा असल्याची प्रखर टीका प्रदेश काँग्रेसचे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
विरोधक हे सत्ताधारी पक्षाचे शत्रू नसुन, जनतेचा आवाज व आशास्थान आहे हे फडणवीसांना समजू नये काय (?) असा सवाल केला.
वास्तविक पाहता, मविआ पक्षातील नेत्यांनी फडणवीसांच्या कालावधी पेक्षाही जास्त कालावधी जनतेच्या पाठींब्यावर, विरोधी पक्षांची तोडफोड न करता व मतचोरींच्या आरोपां शिवाय निर्वादातीत कालावधी वारंवार उपभोगला आहे याचे किमान भान फडणवीसांनी ठेवायला हवे होते.
गांधीवादी, सर्वोदयी विचारांचे पाईक व चळवळीतील, निष्ठावान व निष्कलंक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री हर्षवर्धनजी सपकाळ यांची पात्रता काढण्यापुर्वी, केवळ आमदार गंगाधर फडणवीसांचे चिरंजीव म्हणून ‘तरूण वयात महापौर पद’ पदरात पडणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी विचार करायला हवा होता, अशी पुस्ती ही त्यांनी जोडली
‘आयोगास’ विचारलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीने निवडणूक आयोगाची दातखीळ बसल्याने, जनतेच्या मतदानाच्या मुलभूत अधिकारा विषयी खरेतर सत्तापक्षाने कर्तव्यपुर्तीचा राजधर्म निभावून मतदार याद्या विषयी उपस्थित प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगास देणे भाग पाडले पाहिजे मात्र त्यांना पाठीशी घालण्याचा केविलवाणा प्रयत्नच मुख्यमंत्री फडणवीस व सत्ता पक्ष करीत जनतेचा संशय दृढ करण्याचेच काम करत असल्याचे सांगितले. त्यामुळे राज्यातील जनतेची विश्वासार्हता जोपासत जनतेच्या पाठींब्यावर अनेकदा सत्तेत राहीलेल्या नेत्यांना ‘भरकटलेले / विखुरलेले’ अशी उपहासात्मक टिप्पणी करण्यास अक्कल लागत नसल्याचे काँग्रेस वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.
——————————————