समस्या किंवा अडचणींवर उपाय शोधले जातात. पालकांनीही याबाबत सजग राहून पाल्याची वेळोवेळी विचारपूस केली पाहिजे. मुलांच्या वागणुकीत बदल जाणवला किंवा त्यांना काही अडचणी असतील तर त्यांना प्रेमाने विश्वासात घेऊन विचारपूस केली पाहिजे.
मुस्कान फाउंडेशनच्या संचालक शुभदा रणदिवे यांनी लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारापासून मुलांना सुरक्षित ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, लहान मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्यास याची माहिती त्वरित पोलिसांना देणे गरजेचे आहे. आजच्या सोशल मिडीयाच्या काळात व्हिडीओ, फोटो, चॅटिंगद्वारे ब्लॅकमेलिंगचे प्रमाण वाढले आहे. याबाबत मुलांना अवगत करून देणे हे प्रत्येक पालकांचे आणि शिक्षकांचे कर्तव्य आहे. शाळांमध्ये गुड टच आणि बॅड टच बाबत मुलांना सविस्तर माहिती देणेही गरजेचे आहे. बऱ्याचवेळा लहान मुले या गोष्टी घरच्यांना सांगण्यास घाबरतात किंवा घरचे त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत. पालकांनीही आपल्या पाल्याला विश्वासात घेऊन कोणतीही भिती न बाळगता त्याच्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात पोलिसांत तक्रार देणे गरजेचे आहे.
या मेळाव्यात मुस्कान फाऊंडेशनच्या वतीने ‘लैंगिक शोषण’ या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी केले तर उपस्थितांचे आभार अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी मानले.


