Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedलिंक्‍डइनच्‍या २०२५ टॉप स्‍टार्टअप्‍स लिस्‍टमधून निदर्शनास येते की रोबोटिक्‍स, ऑटोमोटिव्‍ह टेक आणि...

लिंक्‍डइनच्‍या २०२५ टॉप स्‍टार्टअप्‍स लिस्‍टमधून निदर्शनास येते की रोबोटिक्‍स, ऑटोमोटिव्‍ह टेक आणि डिजिटल कन्‍टेन्‍ट पुण्‍यातील अभियांत्रिकी-संचालित स्‍टार्टअप परिसंस्‍थेला चालना देत आहेत

पुणे, २९ ऑक्‍टोबर २०२५: लिंक्‍डइन या जगातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक नेटवर्कने २०२५ लिंक्‍डइन टॉप स्‍टार्टअप्‍स पुणे लिस्‍ट सादर केली आहे. ही लिस्‍ट व्‍यक्‍तींचे करिअर घडवू शकतात अशा उदयोन्‍मुख कंपन्‍यांचे वार्षिक रँकिंग आहे. कर्मचाऱ्यांची वाढ, सहभागाची आवड, रोजगाराची निवड आणि उच्‍च टॅलेंटचे आकर्षण अशा विशेष लिंक्‍डइन डेटावर आधारित ही लिस्‍ट स्‍थानिक नोकरीसाधकांना शहरामधील रोजगार संधी ओळखण्‍यास मदत करू शकतात, अशी माहिती निदर्शनास आणते.

 

इलेक्ट्रिक वेईकल मेकर ईमोटोराड (#1) या लिस्‍टमध्‍ये अव्‍वलस्‍थानी आहे, ज्‍यानंतर क्विक-कॉमर्स युनिकॉर्न झेप्‍टो (#2), जी राष्‍ट्रीय टॉप स्‍टार्टअप्‍स लिस्‍टमध्‍ये अव्‍वलस्‍थानी आहे आणि सास-आधारित डिजिटल लेण्डिंग प्‍लॅटफॉर्म लेण्‍ट्रा (#3) यांचा क्रमांक आहे. विविध श्रेणींमध्‍ये कार्यरत असताना देखील या तिन्‍ही कंपन्‍या झपााट्याने‍ विकसित होत आहेत आणि बाजारपेठेचे मोठ्या प्रमाणात लक्ष वेधून घेत आहेत, ज्‍यामधून निदर्शनास येते की सखोल तंत्रज्ञान आणि ऑपरेशनल उत्‍कृष्‍टता हे पुण्‍यातील अव्‍वल कामगिरी करणाऱ्या स्‍टार्टअप्‍सचे महत्त्‍वपूर्ण फायदे आहेत.

 

पुणे रोबोटिक्‍स क्षेत्रामध्‍ये चमकदार कामगिरी करत आहे, जेथे पेपरमिंट रोबोटिक्‍स (#4) आणि अनबॉक्‍स रोबोटिक्‍स (#5) यांसारख्‍या स्‍टार्टअप्‍स औद्योगिक ऑटोमेशन व पुरवठा-साखळी कार्यक्षमतेमधील नाविन्‍यतेचे नेतृत्‍व करत आहेत. शहरातील टेक परिसंस्‍था देखील गतीशीलतेपर्यंत आपली क्षमता वाढवत आहे, जेथे ईमोटोराड (#1) आणि मॅटर (#8) चार-चाकींपलीकडे ऑटोमोटिव्‍ह नाविन्‍यतेसाठी प्रमुख केंद्र म्‍हणून पुण्‍याच्‍या वाढत्‍या प्रतिष्‍ठेला निदर्शनास आणतात. सात नवीन प्रवेशकांचा समावेश असलेली ही लिस्‍ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर नवप्रवर्तकांच्‍या गतीशील संयोजनाला दाखवते, ज्‍यामधून तंत्रज्ञान व अभियांत्रिकी-संचालित स्‍टार्टअप्‍ससाठी केंद्र म्हणून पुण्‍याची सातत्‍यपूर्ण उत्‍क्रांती निदर्शनास येते.

 

यंदाच्‍या लिस्‍टबाबत मत व्‍यक्‍त करत लिंक्‍डइन करिअर तज्ञ आणि लिंक्‍डइन इंडिया न्‍यूजच्‍या वरिष्‍ठ व्‍यवस्‍थापकीय संपादिका निराजिता बॅनर्जी म्‍हणाल्‍या, ”पुण्‍यातील स्‍टार्टअप गती व्‍यावसायिकांसाठी प्रबळ संधी निर्माण करत आहे, ज्‍याला अभियांत्रिकी सखोलता आणि उत्‍पादन नाविन्‍यतेच्‍या अद्वितीय संयोजनाचे पाठबळ आहे. या कंपन्‍या औद्योगिक कौशल्‍याला गतीशीलता, लॉजिस्टिक्‍स व उद्योग सॉफ्टवेअर या क्षेत्रांमधील विकासात्मक सोल्‍यूशन्‍समध्‍ये बदलत आहेत, जेथे या क्षेत्रांमध्‍ये अत्‍याधुनिक तंत्रज्ञान, विश्‍लेषण व सॉफ्ट स्किल्‍सच्‍या संयोजनाची मागणी आहे. व्‍यावसायिकांसाठी टॉप स्‍टार्टअप्‍स लिस्‍ट जागतिक संबंधित सोल्‍यूशन्‍सवर काम करण्‍याची आणि भारतातील भावी औद्योगिक परिवर्तनाच्‍या अग्रस्‍थानी करिअर घडवण्‍याची संधी देते.”

 

पुण्‍यातील २०२५ लिंक्‍डइन टॉप स्‍टार्टअप्‍सची संपूर्ण लिस्‍ट पुढीलप्रमाणे:

 

1. ईमोटोराड

 

2. झेप्‍टो

 

3. लेण्‍ट्रा

 

4. पेपरमिंट रोबोटिक्‍स

 

5. अनबॉक्‍स रोबोटिक्‍स

 

6. रिकायन टेक्‍नॉलॉजी

 

7. पॉकेट एफएम

 

8. मॅटर

 

9. इमर्सिव्‍हव्हिजन टेक्‍नॉलॉजी

 

10. किसानकनेक्‍ट सेफ फूड्स

 

लिंक्‍डइन टॉप स्‍टार्टअपमध्‍ये रोजगार कसा मिळवावा यासंदर्भात निराजिता बॅनर्जी यांच्‍याकडून काही टिप्‍स:

 

●फक्‍त कोणाला कामावर ठेवत आहे हे न पाहता स्टार्टअप्स कुठे वाढत आहेत याचा मागोवा घ्या: दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत १४ नवीन कंपन्या एका विशिष्ट ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाल्या. तुम्हाला ते जॉब बोर्डमध्ये दिसणार नाही. लवकर गती ओळखण्यासाठी निधी, उत्पादन लाँच आणि बाजारपेठेतील विस्तार पहा.

 

●भावी व्‍यवस्‍थापकांचे मूल्‍यांकन कराल तसे संस्‍थापकांचे देखील मूल्‍यांकन करा: उच्‍च विकसित स्‍टार्टअप्‍समध्‍ये नेतृत्‍व शीर्षकापेक्षा तुमच्‍या विकासाला निर्धारित करते. संस्‍थापक टीम्‍स कशाप्रकारे तयार करतात, संवाद साधतात आणि प्रतिभावान कर्मचाऱ्यांना कायम ठेवतात हे पाहण्‍यासाठी लिंक्‍डइनचा वापर करा. प्रचारापेक्षा विश्वास आणि सुस्‍पष्‍टता महत्त्वाचे आहे.

 

●फक्‍त नाविन्‍यता आणणाऱ्या नाही तर शिस्‍तबद्धतेचे पालन करणाऱ्या व्‍यवसाय मॉडेल्‍सचा शोध घ्‍या: या वर्षीच्‍या टॉप स्‍टार्टअप्‍सनी नाविन्‍यतेसह अंमलबजावणीला प्राधान्‍य दिले आहे. क्विक कॉमर्स नवीन श्रेणींमध्‍ये प्रवेश करत आहेत, एआय पायाभूत सुविधा निर्माण करत आहे, फिनटेक सखोलतेचे निराकरण करत आहेत. महत्त्वाकांक्षा आणि ऑपरेशनल क्षमतेचे संयोजन आहे अशा स्‍टार्टअप्‍सना प्राधान्‍य द्या.

 

●समस्‍यांचे निराकरण करणाऱ्या क्षेत्रांची निवड करा: यंदा टॉप स्‍टार्टअप्‍स तत्‍परता, गुंतागूंती किंवा विश्वासाचे निराकरण करत आहेत. साधने बदलतात, पण समस्‍येचे निराकरण करणे हे खरे आव्‍हान आहे. तुम्‍हाला कंपनी सामना करत असलेली समस्‍या समजली तर तुम्‍ही नेहमी समर्पक राहाल.

 

तुम्‍ही लिंक्‍डइन पुणे २०२५ टॉप स्‍टार्टअप्‍

स लिस्‍ट येथे पाहू शकता.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments