Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedबिलियनब्रेनस् गॅरेज व्हेंचर्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) खुली होणार ४ नोव्हेंबर...

बिलियनब्रेनस् गॅरेज व्हेंचर्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) खुली होणार ४ नोव्हेंबर रोजी

या आयपीओमध्ये फ्लोअर प्राइस इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्यानुसार ४७.५० पट आहे, तर कॅप प्राइस ५०.०० पट,

 

· बोली / ऑफरचा कालावधी मंगळवार, ४ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरू होऊन शुक्रवार, ७ नोव्हेंबर २०२५ रोजी संपेल (बिड डेट्स),

 

· अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली / ऑफरची तारीख सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५,

 

· गुंतवणूकदार किमान १५० इक्विटी शेअर्ससाठी, आणि त्यानंतर १५०च्या पटीत बोली लावू शकतात (‘नंबर ऑफ बिड्स’).

 

भारत, ३१ ऑक्टोबर २०२५ : बिलियनब्रेनस् गॅरेज व्हेंचर्स लिमिटेड या कंपनीच्या समभागांच्या प्राथमिक विक्री योजनेसाठीची (आयपीओ) बोली / ऑफर मंगळवार, ४ नोव्हेंबर २०२५ रोजी खुली होणार आहे.

 

या ऑफरसाठी किंमतपट्टा प्रति इक्विटी शेअर ९५ ते १०० रुपये असा निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकदार किमान १५० इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर १५०च्या पटीत बोली लावू शकतात.

 

प्रत्येक इक्विटी शेअरचे दर्शनी मूल्य २ असलेल्या या आयपीओमध्ये १,०६० कोटी रुपयांपर्यंतच्या नवीन समभागांची विक्री (फ्रेश इश्यू) आणि ५५,७२,३०,०५१ इक्विटी शेअर्सच्या विक्रीसाठीचा प्रस्ताव (ऑफर फॉर सेल – ओएफएस) यांचा समावेश आहे.

 

अँकर गुंतवणूकदारांसाठी बोलीची तारीख सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५ अशी ठरविण्यात आली आहे. सार्वजनिक स्तरावरील बोलीची प्रक्रिया शुक्रवार, ७ नोव्हेंबर २०२५ रोजी बंद होईल.

 

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे ऑफर करण्यात आलेले हे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) या दोन्ही शेअर बाजारांवर (संयुक्तपणे “स्टॉक एक्सचेंजेस”) सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. या ऑफरच्या दृष्टीने नामनिर्दिष्ट स्टॉक एक्सचेंज म्हणून एनएसईची निवड करण्यात आली आहे.

 

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, जे.पी. मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजर्स लिमिटेड या संस्था या ऑफरच्या बुक रनिंग लीड मॅनेजर्स (बीआरएलएम्) आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments