Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedहंगामा ओटीटी सादर करीत आहे ‘डर्टी स्कॅम्स’ — चतुर महिला आणि गुन्ह्यांवर...

हंगामा ओटीटी सादर करीत आहे ‘डर्टी स्कॅम्स’ — चतुर महिला आणि गुन्ह्यांवर आधारित एक रोमांचक मालिका

मुंबई, 31 ऑक्टोबर 2025 – भारतातील आघाडीच्या डिजिटल मनोरंजन प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या हंगामा ओटीटीने आपल्या नवीन ओरिजिनल अँथॉलॉजी मालिका, ‘डर्टी स्कॅम्स’ ची घोषणा केली आहे. ही रोमांचक क्राईम-थ्रिलर मालिका फसवणुकीच्या आणि रहस्यमय जगात घडते आणि यात इश्क पार्लर, आश्रम, शगुन में धोखा, दीमक आणि राइट स्वाईप अशा पाच स्वतंत्र कथा दाखवण्यात आल्या आहेत. प्रत्येक भागात एक वेगळी स्त्री दाखवली आहे जी अत्यंत नियोजनबद्ध आणि धाडसी पद्धतीने आपला स्कॅम पूर्ण करते — कोणतीही अडचण आली तरी काम अपूर्ण राहत नाही. तीक्ष्ण लेखन, प्रभावी अभिनय आणि बिनधास्त शैलीमुळे ही मालिका आकर्षण, फसवणूक आणि महत्त्वाकांक्षा या विषयांना अधोरेखित करते. या मालिकेत पवित्रा पुनिया, पूजा बनर्जी, अलीशा पनवार, इशिता गांगुली, दिपंकना दास, रुषद राणा, इम्रान नाझीर खान, अंकित राज आणि अक्षया शेट्टी यांसारख्या कलाकारांचा सहभाग आहे.

डर्टी स्कॅम्स ही मालिका 30 ऑक्टोबरपासून हंगामा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. पहिल्या टप्प्यात ‘इश्क पार्लर’ आणि ‘आश्रम’ हे दोन भाग दाखवले जातील. त्यानंतर 6 नोव्हेंबरला ‘शगुन में धोखा’ आणि ‘दीमक’ हे भाग प्रदर्शित होतील, तर शेवटचा भाग ‘राइट स्वाईप’ 13 नोव्हेंबरपासून पाहायला मिळेल. ही अँथॉलॉजी मालिका हुशारी, धाडस आणि रोचक कथनशैलीचा संगम आहे. यात दाखवले आहे की, जेव्हा बुद्धिमत्ता आणि धाडस एकत्र येतात, तेव्हा प्रत्येक फसवणुकीच्या मागे एक पाहण्यासारखी कहाणी असते.

या मालिकेबाबत बोलताना हंगामा डिजिटल मीडियाचे सीईओ सिद्धार्थ रॉय म्हणाले, “डर्टी स्कॅम्सद्वारे आम्ही अशा कथा तयार करू इच्छितो ज्या प्रेक्षकांच्या मनाशी खऱ्या अर्थाने जोडल्या जातील. या कथा योग्य आणि अयोग्य याबद्दल विचार करायला लावतात, काय करायला प्रवृत्त करू शकते हे दाखवतात आणि फसवणूक कशी अनपेक्षित पद्धतीने घडते हेही उलगडतात. प्रत्येक भागात एक वेगळी कथा आहे, जी महिलांच्या दृष्टिकोनातून सांगितली आहे. यात वेगवान आणि थरारक मनोरंजनासोबत विचार करायला लावणारी अर्थपूर्ण कथा मांडली आहे.”

‘इश्‍क पार्लर’ मधील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अभिनेत्री पवित्रा पुनिया म्हणाली, “या पात्रासाठी काम करताना माझ्यासाठी सर्वात आव्हानात्मक गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच स्क्रीनवर जवळिकीचे (intimacy) दृश्य सादर करणे होते. पण संपूर्ण टीमचे आभार, त्यांनी मला पूर्णपणे सहजतेने आणि व्यावसायिक पद्धतीने काम करता येईल असे वातावरण दिले, ज्यामुळे ते सहजपणे करता आले.”

‘आश्रम’ मधील आपल्या मोहिनी या भूमिकेबद्दल बोलताना पूजा बनर्जी म्हणाली, “मोहिनी या पात्रात एक वेगळे आणि काळावर मात करणारे आकर्षण आहे. बाहेरून ती खूप सोज्वळ आणि संयमी दिसते, पण तिच्या मनात भावनांचे अनेक वादळं दडलेले आहेत. हे पात्र साकारताना मला सौंदर्य आणि धोक्याच्या सीमारेषेवर चालल्यासारखं वाटले, आणि या विरोधाभासाचा प्रत्येक क्षण मला खूप आवडला.”

‘इश्क पार्लर’ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारे इम्रान नझीर खान म्हणाले, “मी साकारलेले पात्र लोभ आणि अपराधीपणाच्या भावनेने प्रेरित आहे. त्याच्या मनात त्याला काय हवे आहे आणि काय गमावण्याची भीती वाटते, यामध्ये तो अडकलेला असतो. माझ्यासाठी ही भूमिका खलनायक किंवा नायक साकारण्याबद्दल नव्हती, तर माणसातील कमजोरी आणि त्या भावनांमुळे तो कसा चुकीचे निर्णय घेतो हे दाखवण्याबद्दल होती जे लोकांना कधी कधी हताशपणे काहीही करण्यास प्रवृत्त करतात.”

‘आश्रम’ मधील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अक्षया शेट्टी म्हणाली, “माझे पात्र खूप संवेदनशील आहे. ती प्रत्येक आव्हानातून काहीतरी शिकते आणि त्यातून पुढे जाते. मला या भूमिकेतील सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे ती नैतिकतेने नव्हे, तर तिच्या हेतूंनी आणि ठाम विचारांनी ओळखली जाते. तिच्या संपूर्ण प्रवासात ती आपल्या विश्वासावर ठाम राहते, आणि तिच्या दृढ निश्चय व निष्ठेच्या मार्गदर्शनाखाली पुढे जात राहते.”

आश्रमला जीवंत रूप देणारी सानिया खेरा म्हणाली, “मला माझ्या भूमिकेतील सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे ती खूप खरी आणि वास्तव वाटते. ती कधी संवेदनशील, कधी ठाम, आणि परिस्थितीने प्रेरित अशी व्यक्तिरेखा आहे. त्या प्रामाणिक भावनांना पडद्यावर खऱ्या अर्थाने दाखवणे माझ्यासाठी एक सुंदर अनुभव होता.”

आश्रममधील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना विशाल चौधरी म्हणाले,“ माझे पात्र असे आहे ज्याला वाटते की सगळं त्याच्या नियंत्रणात आहे, पण शेवटी त्याला कळते की त्यालाच कुणीतरी चकवले आहे. ही कथा तुम्हाला सतत विचार करायला लावते की खरे सूत्र कोणाच्या हातात आहेत — आणि हाच या कथेचा सगळ्यात मजेशीर भाग आहे.”

आश्रममधील जसजोत भसीन म्हणाले,“माझी व्यक्तिरेखा या संपूर्ण कटकारस्थानांच्या वातावरणात एक शांतता आणि स्थिरतेचा भाव आणते, पण ती शांतता कमजोरी समजू नका. त्याच्या शांत स्वभावात एक विचारपूर्वक गणित आहे आणि तेच त्याला धोकादायक बनवते.”

शगुन में धोखा’ मधील मुख्य भूमिका साकारणारी अलीशा पनवार म्हणाली, “या दृश्यांचे शूट करताना मी खरोखरच भावनिक झाले. कोणाचं मन तुटताना पाहणं खूप वेदनादायक होतं. ज्याने तुम्हाला आपलं मन दिलं आहे, त्याची फसवणूक करणे कधीच योग्य नाही. खरं सांगायचं तर, अशी फसवणूक कोणालाही खऱ्या आयुष्यात कधीही अनुभवायला लागू नये, अशी माझी इच्छा आहे.”

शगुन में धोखा’ मधील मुख्य भूमिका साकारणारा साहिल उप्पल म्हणाला, “या मालिकेत माझी भूमिका ‘शिवम’ माझ्यासाठी भावनिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक होती. तो असा व्यक्ती आहे जो आपल्या प्रेमासाठी आई-वडिलांनाही मागे सोडतो. त्याने त्या मुलीला आनंदी ठेवण्यासाठी सगळं काही केलं, पण त्याला कल्पनाही नव्हती की तेच प्रेम एक दिवस त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठं दुःख बनेल.”

अँथॉलॉजीबद्दल बोलताना ‘दीमक’मधील मुख्य भूमिका साकारणारी इशिता गांगुली म्हणाली, “डर्टी स्कॅम्स ही फक्त फसवणुकीबद्दलची मालिका नाही. ती सत्ता, निवड आणि जगण्यासाठीच्या संघर्षाबद्दल आहे. ‘दीमक’मध्ये माझं पात्र योग्य आणि अयोग्य यांच्या सीमारेषेवर चालते, आणि त्या संघर्षाचा अनुभव पडद्यावर साकारणं अत्यंत रोमांचक होतं.”

दीमक’मधील मुख्य भूमिका साकारणारे रुषद राणा आपल्या अनुभवाबद्दल बोलताना म्हणाले, “या मालिकेत माझ्या पात्राचं सगळ्यात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे त्याची अनपेक्षित वागणूक. तो दिसतो तसा अजिबात नाही, आणि हाच त्याचा रोचक भाग आहे. या पात्रात आकर्षण आहे, थोडीशी फसवणूक आहे, आणि आतून एक शांत अस्वस्थताही दडलेली आहे.”

‘राइट स्वाईप’ मधील मुख्य भूमिका साकारणारी दिपंकना दास म्हणाली, “माझी व्यक्तिरेखा अशा जगात जगते जिथे विश्वास खूप दुर्मिळ असतो आणि तिथे टिकून राहणे हे पुढचं पाऊल किती शहाणपणाने टाकता यावर अवलंबून असते. मला तिच्यातील धाडस आणि आत्मविश्वास खूप आवडला. ती नियमांप्रमाणे वागत नाही, कारण ते नियम कधीच तिच्यासाठी बनवलेले नाहीत.”

राईट स्वाइप मधील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अंकित राज म्हणाले,“माझी व्यक्तिरेखा ‘जोहान’ हा एक प्रामाणिक माणूस आहे, जो फक्त खरं प्रेम मिळवू इच्छित होता. पण कधी कधी चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे खूप महागात पडते, आणि सगळं काही गमवावं लागते.”

सस्पेन्स, ड्रामा, क्राईम आणि थ्रिलर यांचा सुंदर संगम असलेली ‘डर्टी स्कॅम्स’ ही मालिका हंगामाच्या दमदार ओरिजिनल मालिकांच्या यादीतील आणखी एक धाडसी पाऊल आहे. ही मालिका हुशार, गुंतागुंतीची आणि खूपच आकर्षक आहे — अशी की, पुढचा “स्कॅम” कोणावर होणार हे जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहणं थांबवू शकत नाही. ‘डर्टी स्कॅम्स’चे पहिले दोन भाग हंगामा ओटीटी, तसेच टाटा प्ले बिंज, वॉचो, बीएसएनएल, प्लेबॉक्सटीव्ही, रेलवायर ब्रॉडबँड, एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले आणि डोर टीव्ही वर पाहता येतील. नवीन भाग प्रत्येक आठवड्याला 13 नोव्हेंबरपर्यंत प्रदर्शित होत राहतील.

हंगामा ओटीटीबद्दल:

हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट प्रा. लि.चा एक भाग असलेले हंगामा ओटीटी हे एक बहुआयामी डिजिटल मनोरंजन व्यासपीठ आहे, जे प्रेक्षकांसाठी विविध प्रकारचे मनोरंजन सादर करते — नवीन गाणी, ब्लॉकबस्टर चित्रपट, आकर्षक ओरिजिनल शो, म्युझिक व्हिडिओ आणि पॉडकास्टपर्यंत सर्व काही येथे उपलब्ध आहे. हंगामा ओरिजिनल्सचा उद्देश पारंपरिक कथाकथनापेक्षा वेगळ्या आणि नवनवीन प्रकारच्या कथा सादर करणे आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना डिजिटल कंटेंटचा एक ताजा आणि वेगळा अनुभव मिळतो. या प्लॅटफॉर्मवर इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधील 5000 पेक्षा जास्त चित्रपटांची मोठी व्हिडिओ लायब्ररी आहे. याशिवाय 1500 पेक्षा जास्त शॉर्ट फिल्म्स आणि 7500+ तासांचे मुलांसाठी व टीव्हीवरील मनोरंजनात्मक कार्यक्रम उपलब्ध आहेत. हंगामाचा म्युझिक कॅटलॉगमध्ये 3 कोटीपेक्षा जास्त गाणी, म्युझिक व्हिडिओ आणि पॉडकास्ट्स 20 पेक्षा अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहेत. ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोशी जोडलेले असल्यामुळे, हंगामा प्रवासादरम्यान संगीतप्रेमींना अखंड आणि सुरळीत अनुभव देते.

हंगामा ओटीटी हे टाटा प्ले बिंज, वॉचो, बीएसएनएल, प्लेबॉक्सटीव्ही, रेलवायर ब्रॉडबँड, एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले आणि डोर टीव्हीवर उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी भेट द्या

: www.hungama.org

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments