Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedफोर्स मोटर्सने दुसरी तिमाही व पहिल्‍या सहामाहीमध्‍ये आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च आर्थिक निकालांची नोंद...

फोर्स मोटर्सने दुसरी तिमाही व पहिल्‍या सहामाहीमध्‍ये आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च आर्थिक निकालांची नोंद केली

विक्रमी आयटीडीए आणि नफा मार्जिन संपादित केले

पुणे, नोव्‍हेंबर ७, २०२५: फोर्स मोटर्स लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या व्‍हॅन उत्‍पादक आणि सामायिक व विशेषीकृत गतीशीलता सोल्‍यूशन्‍समधील आघाडीच्‍या कंपनीने आज ३० सप्‍टेंबर २०२५ रोजी समाप्‍त झालेल्‍या तिमाहीसाठी (आर्थिक वर्ष २०२५-२६ ची दुसरी तिमाही) आपल्‍या आर्थिक निकालांची घोषणा केली. कंपनीने दुसरी तिमाही आणि पहिल्‍या सहामाहीमध्‍ये आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च कामगिरीची नोंद केली, जेथे विक्रमी ईबीआयटीडीए आणि नफा मार्जिन संपादित केले. हा कंपनीच्‍या प्रवासामधील महत्त्वाचा टप्‍पा ठरला आहे, जो त्‍यांच्‍या व्‍यवसाय पायाभूत सुविधांच्‍या क्षमतेची पुष्‍टी देतो.

 

प्रमुख आर्थिक वैशिष्‍ट्ये: (स्‍वतंत्र)

 

 

आर्थिक वर्ष २६ ची दुसरी तिमाही

आर्थिक वर्ष २६ ची पहिली सहामाही

महसूल (एकूण उत्‍पन्‍न)

२१०६ कोटी रूपये, वार्षिक ८ टक्‍क्‍यांची वाढ

४४२८कोटी रूपये, वार्षिक १५ टक्‍क्‍यांची वाढ

ईबीआयटीडीए

३८७ कोटी रूपये, वार्षिक ३३ टक्‍क्‍यांची वाढ

७४४ कोटी रूपये, वार्षिक ३४ टक्‍क्‍यांची वाढ

करपूर्व नफा (पीबीटी)

३४६ कोटी रूपये, वार्षिक ४६ टक्‍क्‍यांची वाढ

६०२ कोटी रूपये, वार्षिक ५० टक्‍क्‍यांची वाढ

करोत्तर नफा (पीएटी)

३५० कोटी रूपये, वार्षिक १४८ टक्‍क्‍यांची वाढ*

५३५ कोटी रूपये, वार्षिक १०५ टक्‍क्‍यांची वाढ*

एकूण कर्ज

काही नाही

काही नाही

* नवीन कर प्रणालीमध्‍ये बदल केल्‍यामुळे

३ वर्षांसाठी सीएजीएआर ३५ टक्‍क्‍यांहून अधिक

 

 

 

 

ऑपरेशनल वैशिष्‍ट्ये:

प्रबळ विक्री गती, तसेच अर्बनिया, ट्रॅव्‍हलर, गुरखा (डिफेन्‍स व्‍हेरिएण्‍ट्स), मोनोबस आणि ट्रॅक्‍स श्रेणीमध्‍ये प्रबळ मागणीमुळे आर्थिक वर्ष २६ च्‍या पहिल्‍या सहामाहीत देशांतर्गत आकारमान १६ टक्‍क्‍यांची वाढले.

कंपनीने आर्थिक वर्ष २६ च्‍या पहिल्‍या सहामाहीत गेल्‍या वर्षीच्‍या याच कालावधीच्‍या तुलनेत निर्यातींमध्‍ये ७७ टक्‍के वाढीची देखील नोंद केली (लाइट कमर्शियल वेईकल्‍स, स्‍पेशल वेईकल्‍स डिव्हिजन आणि युनिटी वेईकल्‍स).

कंपनीने आपली शून्‍य कर्जाची स्थिती कायम ठेवली आहे, ज्‍यामधून आर्थिक सावधगिरी आणि ऑपरेशनल उत्‍कृष्‍टता दिसून येते.

ट्रॅव्‍हलर प्‍लॅटफॉर्मने ७० टक्‍क्‍यांहून अधिक मार्केट शेअरसह विभागातील आपले नेतृत्‍व कायम ठेवले आहे.

उत्‍पादन कार्यक्षमता वाढवण्‍यासाठी, उत्‍पादन ऑफरिंग्‍ज अपग्रेड करण्‍यासाठी आणि देशभरातील डिलर नेटवर्क मजबूत करण्‍यासाठी धोरणात्‍मक उपक्रमांनी प्रबळ व शाश्वत निकाल देणे सुरू ठेवले आहे.

या कामगिरीबाबत मत व्‍यक्‍त करत फोर्स मोटर्स लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. प्रसन फिरोदिया म्‍हणाले, ”फोर्स मोटर्ससाठी ही महत्त्वपूर्ण तिमाही राहिली आहे, जेथे आमच्‍या इतिहासामधील आतापर्यंतची सर्वोच्‍च कामगिरी करण्‍यात आली आहे, तसेच आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्‍ये आतापर्यंतचे सर्वोच्‍च दुसरी तिमाही व पहिली सहामाही निकाल ठरले आहेत. आमच्‍या कामगिरीमधून आमच्‍या उत्‍पादन पोर्टफोलिओची ताकद, ऑपरेशनल उत्‍कृष्‍टता आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन दिसून येतो.

सेगमेंट क्रिएटर व मार्केट लीडर म्‍हणून फोर्स मोटर्सने ग्राहकांच्‍या गरजांची अपेक्षा व समाधान करणारी उत्‍पादने व सेवा ऑफरिंग्‍जच्‍या माध्‍यमातून भारतातील सामायिक गतीशीलता क्षेत्राला सतत आकार दिला आहे आणि विस्‍तार केला आहे. हा दूरगामी दृष्टिकोन, तसेच अर्बनिया, ट्रॅव्‍हलर, गुरखा (डिफेन्‍स व्‍हेरिएण्‍ट्स), मोनोबस आणि ट्रॅक्‍स या आमच्‍या प्रमुख उत्‍पादन श्रेणींमध्‍ये प्रबळ मागणीने विक्री व लाभक्षमतेमध्‍ये स्थिर विकासाला चालना दिली आहे.

हा महत्त्वपूर्ण टप्‍पा अवधान केंद्रित करण्‍याच्‍या क्षमतेला दृढ करतो. सामायिक प्रवासी गतीशीलता क्षेत्रातील आमच्‍या मुलभूत क्षमतांशी बांधील राहत, आमच्‍या क्षमतांचा फायदा घेत आणि उत्तम अंमलबजावणीसह ग्राहकांनी आमच्‍यावर दाखवलेल्‍या विश्वासह फोर्स मोटर्समध्‍ये आम्‍ही नवीन संधी व्‍यापून घेतल्‍या आहेत आणि अशी अपवादात्‍मक वाढ केली आहे.

अधिक पुढे जात, फोर्स मोटर्स शाश्वत विकासाला चालना देण्‍याप्रती कटिबद्ध आहे, जेथे ग्राहक समाधानावरील आमचा फोकस वाढवत आहोत आणि आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठांमध्‍ये आमची उपस्थिती विस्‍तारत आहोत. आम्‍ही आमचा उत्‍पादन पोर्टफोलिओ, उत्‍पादन क्षमता व बाजारपेठ पोहोच मजबूत करत राहू, तसेच या गतीला अधिक दृढ करू आणि आगामी तिमाहींमध्‍ये ही वाढ कायम ठेवण्‍यास उ

त्‍सुक आहोत,” असे ते शेवटी म्‍हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments