गुरूग्राम । नोव्हेंबर 10, २०२५: राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिनानिमित्त ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशन (एचएमआयएफ) या ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल)च्या सीएसआर शाखेने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास (आयआयटी मद्रास) सोबत सहयोगाने विकसित केलेल्या त्यांच्या प्रमुख ‘ह्युंदाई होप फॉर कॅन्सर’ उपक्रमाच्या माध्यमातून कॅन्सर केअरमध्ये परिवर्तन घडवून आणण्याप्रती आपली कटिबद्धता दृढ केली. सप्टेंबर २०२५ मध्ये लाँच झाल्यापासून या उपक्रमाने कर्करोग संशोधन, प्रतिबंध व जागरूकतेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे, ज्याचा हजारो व्यक्तींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आला आहे.
या उपक्रमाची खासियत आहे भारतातील पहिल्या समुदाय-आधारित कॅन्सर टिश्यू बायोबँककरिता आश्रयस्थान आयआयटी मद्रास येथील ह्युंदाई सेंटर फॉर कॅन्सर जीनोमिक्स आणि नवीन लाँच करण्यात आलेले भारत कॅन्सर जीनोम अॅटलास (बीसीजीए), जो देशातील पहिला ओपन-अॅक्सेस कॅन्सर जीनोम डेटाबेस आहे, ते वैयक्तिकृत ऑन्कोलॉजीमधील प्रगतीला गती देईल.
भारतातील कॅन्सर केअरमध्ये परिवर्तन घडवून आणण्याप्रती एचएमआयएफच्या संकल्पाला सादर करत एचएमआयएलच्या कॉर्पोरेट अफेअर्स, कॉर्पोरेट कम्युनिकेशन अँड सोशलचे एव्हीपी व व्हर्टिकल हेड श्री. पुनीत आनंद म्हणाले, ”ह्युंदाई होप फॉर कॅन्सरमधून आमचा दृढ विश्वास दिसून येतो की तंत्रज्ञान, दयाळूपणा व सहयोग कॅन्सर केअरमधील परिवर्तनात्मक बदलाला चालना देऊ शकतात. राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिनानिमित्त आम्ही भविष्य घडवण्याप्रती आमचे प्रयत्न दृढ करत आहोत, जेथे प्रत्येक नागरिकाला वेळेवर, वैयक्तिकृत आणि प्रतिष्ठित कॅन्सर केअर उपलब्ध होईल. ५६ कोटी रूपयांची गुंतवणूक, तसेच समर्पित ३ कोटी रूपयांच्या कॅन्सर केअर फंडासह एचएमआयएफ लवकर निदान, संशोधन, उपचार व सामुदायिक पोहोचसाठी समान उपलब्धता निर्माण करण्याप्रती काम करत आहेत. या प्रयत्नांमधून आतापर्यंत १०,००० हून अधिक व्यक्तींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आला आहे.”
ह्युंदाई होप फॉर कॅन्सर: संपादित करण्यात आलेले प्रमुख टप्पे
सामुदायिक पोहोच व तपासणी:
§ तामिळनाडूमध्ये १०३ कर्करोग जागरूकता व तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये १०,००८ व्यक्तींनी सहभाग घेतला.
§ लवकर निदान तपसाण्यांमध्ये तोंड, गर्भाशय, कोलन, स्तन आणि प्रोस्टेट कर्करोगांची तपासणी करण्यात आली.
§ ३८० हून अधिक व्यक्तींना कर्करोग असल्याचे आढळून आले आणि त्यांना प्रगत केअरसाठी सरकारी हॉस्पिटल्सकडे पाठवण्यात आले.
कॅन्सर टिश्यू बायोबँक व जीनोमिक सिक्वेन्सिंग:
§ १,०७० कर्करोग उतींचे नमुने गोळा करण्यात आले आणि ५२८ पीडियाट्रिक ल्युकेमिया केसेससाठी संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंग पूर्ण करण्यात आले.
§ सुरू असलेल्या जीनोमिक विश्लेषणाचा लवकर निदान आणि आजारावर देखरेख ठेवण्यासाठी भारताशी संबंधित बायोमार्कर जीन पॅनेल्स ओळखण्याचा मनसुबा आहे.
§ भारतातील पहिले ओपन-अॅक्सेस कॅन्सर जीनोम डेटाबेस म्हणून भारत कॅन्सर जीनोम अॅटलास (बीसीजीए) लाँच करण्यात आले, जे आयआयटी मद्रासद्वारे आयोजित करण्यात आले.
एचपीव्ही लसीकरण मोहिम:
§ तामिळनाडूमधील अरियालूर, विरुधुनगर आणि सालेमममधील कार्किनोस हेल्थकेअर आणि कॅन्सर रिसर्च अँड रिलीफ ट्रस्ट (सीआरआरटी) यांच्या सहयोगाने ५२५ मुलींचे ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) प्रतिबंधासाठी लसीकरण करण्यात आले.
आगामी उपक्रम:
§ देशभरातील आघाडीच्या आरोग्यसेवा संस्थांसोबत सहयोगाने वंचित मुलांसाठी मोफत कर्करोग उपचार.
§ आर्थिक वर्ष २०२६ पर्यंत जीनोमिक सिक्वेन्सिंग आणि मॉलिक्युलर ऑन्कोलॉजीमध्ये १०० हून अधिक लॅब व्यावसायिकांना प्रशिक्षित करण्यासाठी तंत्रज्ञ प्रशिक्षण उपक्रम.
§ तामिळनाडूतील १७ जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे सुसज्ज असलेले कॅन्सर स्क्रिनिंग वेईकल (कर्करोग तपासणी वाहन) पोहोचले आहे, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विस्तार करण्याचे नियोजन आहे.
पुढील चार वर्षांमध्ये तामिळनाडू, हरियाणा आणि महाराष्ट्रात एकूण २२५ हून अधिक कर्करोग जागरूकता आणि तपासणी शिबिरे आयोजित केली जातील, जे १.२७ लाख व्यक्तींपर्यंत पोहोचतील आणि ५,००० हून अधिक मुलींचे एचपीव्ही प्रतिबंधासाठी लसीकरण केले जाईल.
जारीकर्ता:
ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशन
प्लॉट क्र. एच-१, सिपकोट औद्योगिक पार्क,
इरुंगट्टुकोट्टई, श्रीपेरुंबदूर तालुका,
कां
चीपुरम जिल्हा, तामिळनाडू – ६०२ ११७.


