पुणे :
पुण्याचे माजी उपमहापौर आणि ज्येष्ठ समाजसेवक रामदास पवार यांच्या जयंतीनिमित्त गोखलेनगर- वडारवाडी परिसरात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी उपस्थित राहून पवार यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
उमेश वाघ, आदित्य माळवे, प्रवीण डोंगरे, ऍड. शिरीष जाधव, हेमंत डाबी, श्रेयस त्रिपुटे, भरत जोरे, नितीन परदेशी आणि विशाल गुंड यांनी संयोजन केले. समाजातील विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांनी या प्रसंगी उपस्थित राहून पवार यांच्या कार्याची प्रेरणा घेण्याचा संकल्प व्यक्त केला.
या अभिवादन सभेत पवार यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी कार्याची आठवण करून देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.


