पुणे,11 नोव्हेंबर 2025*: द फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक ॲन्ड गायनेकोलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया (फॉग्सी) तर्फे संघटनेच्या संपूर्णा पब्लिक फोरम उपक्रमा अंतर्गत गर्भधारणापूर्व आरोग्यावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.हा कार्यक्रम पुणे ऑब्स्टेट्रिक ॲन्ड गायनेकोलॉजिकल सोसायटी (पीओजीएस) च्या सहयोगाने संपन्न होत आहे. फॉग्सीच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सुनिता तांदुळवाडकर यांच्या नेतृत्वाखाली गुरूवार,13 नोव्हेंबर 2025 रोजी आयएमए हॉल, टिळक रोड येथे दुपारी 2 ते सायंकाळी 5 दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रसिध्द अभिनेत्री मृण्मयी देशपांडे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असतील.14 ते 16 नोव्हेंबर 2025 दरम्यान जे.डब्ल्यू.मॅरिएट येथे फॉग्सी प्रेसिडेंशियल कॉन्फरन्स (अध्यक्षीय परिषद) “स्टार संपूर्णा ” याचाच हा कार्यक्रम एक पूर्व भाग आहे.
संपूर्णा “सार्वजनिक मंचात फॉग्सीच्या राष्ट्रीय अध्यक्षा व स्टार संपूर्णाच्या संयोजक अध्यक्षा डॉ.सुनिता तांदुळवाडकर ,पीओजीएसचे अध्यक्ष डॉ मनिष माचवे,फॉग्सीच्या राष्ट्रीय सह सचिव डॉअश्विनी काळे,पीओजीएसचे सचिव डॉ.निलेश बलकवडे, डॉ पूजा लोढा ( आयोजक सचिव), कार्यक्रमाचे संयोजक डॉ.वैजयंती पटवर्धन ,डॉ.अलका कुथे, डॉ रेवती राणे तसेच समन्वयक डॉ.आरती निमकर ,डॉ अलका क्षीरसागर ,डॉ संध्या मेश्राम आदी तज्ञ उपस्थित असतील.
या कार्यक्रमात गर्भधारणापूर्व आरोग्याचे महत्त्व, शारीरिक,मानसिक तयारी,पोषण अशा अनेक विषयांवर तज्ञांकडून मार्गदर्शन मिळेल. हा विषय लोकांपर्यंत प्रभावीपर्यंत पोहचावा,यादृष्टीने ” माँ “या विषयावर नृत्य स्पर्धा आणि “सुरक्षित मातृत्व” या विषयावर नाटिका स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात येतील.
संपूर्णा पब्लिक फोरम हा फॉग्सीचा राष्ट्रीय उपक्रम असून गर्भधारणापूर्व आरोग्याबाबत जनजागृती करणे आणि नवमाता व नवजात मृत्यूदर कमी करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी फॉग्सी तर्फे विविध आरोग्य शिबिरे व जनजागृती मोहिमा हाती घेण्यात येतात . सामाजिक जागृतीच्या दृष्टीने उचलेले हे महत्त्वाचे पाऊल असून, त्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा . सशक्त माता, निरोगी भावी पिढी घडवण्यासाठी अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.


