प्रीमियम केबिन अनुभवासह आरामदायीपणामध्ये वाढ, तसेच मागील आसनाबाबत विशेष सुविधा
मुंबई, ११ नोव्हेंबर २०२५: टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्सने आज नवीन व सुधारित एक्झिक्युटिव्ह वैशिष्ट्ये असलेल्या कर्व्हच्या लाँचची घोषणा केली. स्मार्ट इंजीनिअरिंग इनोव्हेशन्सच्या माध्यमातून टाटा मोटर्सने सर्व कर्व्ह व्हेरिएण्ट्समध्ये (आयसीई व ईव्ही) इंटीरिअर मोठ्या प्रमाणात सुधारले आहे, ज्यासह केबिनमधील अनुभवासह अधिक आरामदायीपणा व व्यावहारिकता वाढली आहे. भर करण्यात आलेली प्रीमियम वैशिष्ट्ये जसे भारतातील पहिल्या आर-कम्फर्ट® सीट्ससह पॅसिव्ह व्हेंटिलेशन, सेरेनिटी स्क्रिन रिअर सनशेड्स, रिअर आर्मरेस्टवर ईजीसिप कप डॉक्स, व्हाइट कार्बन फायबर फिनिशमध्ये डॅशबोर्ड इन्सर्ट आणि लाइटर इंटीरिअर (ललितपूर ग्रे)सह प्लश बेनेक-कलिको लेदरेट सीट्स यांसह कर्व्ह ग्राहकांना दर्जात्मक ड्रायव्हिंग अनुभव देते*.
लक्झरी दर्जा वाढवत कर्व्हमध्ये ट्विनझोन क्लायमेट कॉन्सिर्ज एअर कंडिशनिंगची देखील भर करण्यात आली आहे, तर Curvv.ev प्युअरकम्फर्ट रिअर को-पॅसेंजर फूटरेस्ट आणि एर्गोविंग हेडरेस्टसह आरामदायीपणामध्ये अधिक वाढ करते, ज्यासह तिच्या दर्जामधील आरामदायीपण व विशिष्टतेला नव्या उंचीवर नेले आहे*.
आकर्षक रिअर सीट आणि नवीन रूपातील एक्झिक्युटिव्ह वैशिष्ट्यांसह हे सुधारित व्हर्जन कर्व्हच्या १४.५५ लाख रूपयांपासून किंमत सुरू होणाऱ्या सर्व अकॉम्प्लीश परसोनामध्ये, तसेच १८.४९ लाख रूपयांपासून किंमत सुरू होणाऱ्या Curvv.ev च्या अकॉम्प्लीश व एम्पॉवर्ड परसोनामध्ये उपलब्ध असेल.
टाटा कर्व्ह आपली विशिष्ट एसयूव्ही कूपे डिझाइन आणि स्टाइल, नाविन्यता व व्यावहारिक वैशिष्ट्यांच्या परिपूर्ण संतुलनासह मध्यम आकाराच्या एसयूव्ही विभागाला नव्या उंचीवर घेऊन जाते. आयसीई व ईव्ही पॉवरट्रेन्ससाठी अनुक्रमे प्रगत अॅटलास व acti.ev आर्किटेक्चरवर डिझाइन करण्यात आलेली कर्व्ह प्रभावी इंधन कार्यक्षमता आणि वास्तविक विश्वातील रेंज देते.
केबिन अधिक आरामदायीपणा देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, ज्यामध्ये लार्ज वॉईस अॅक्टिव्हेटेड पॅनोरूमिक सनरूफसह मूड लायटिंग आणि अनेक व्यावहारिक वैशिष्ट्ये आहेत, जसे गेस्चर-अॅक्टिव्हेटेड पॉवर्ड टेलगेट आणि अधिक सोयीसुविधेसाठी विशाल ५०० लिटर बूट स्पेस. या वेईकलमधील तंत्रज्ञानाची विशिष्टता म्हणजे हार्मनची ३१.२४ सेमी (१२.३ इंच) सिनेमॅटिक टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टम, त्यासोबत ९-स्पीकर जेबीएल साऊंड सिस्टम आणि Arcade.ev, जे सर्वोत्तम ऑडिओ अनुभव देते.
आयसीई (हायपेरियन गॅसोलाइन डायरेकट इंजेक्शन इंजिन, १.२ लिटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन व १.५ लिटर क्रियोजेट डिझेल इंजिन) आणि ईव्ही पॉवरट्रेन्ससह ऑटोमॅटिक व मॅन्युअल ट्रान्समिशन पर्यायांमध्ये उपलब्ध असलेल्या कर्व्हमधून टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्सचे मल्टी-पॉवरट्रेन धोरण दिसून येते, जे विविध ग्राहकांच्या पसंतींची पूर्तता करत आहे; कंपनीचा सुरक्षिततेप्रती अभिमानी वारसा कायम राखत कर्व्ह लेव्हल २ एडीएएससह येते आणि अभिमानाने ५-स्टार भारत एनसीएपी सुरक्षितता रेटिंग संपादित केले आहे, ज्यामधून बारकाईने केलेली रचना, सर्वोच्च सुरक्षितता मानकांचे पालन दिसून येते.


