भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी पुस्तक प्रकाशन आणि पंडित नेहरूंनी लिहिलेल्या पुस्तकांवर आधारित व्याखाने आयोजित करण्यात आली आहेत. हा कार्यक्रम शुक्रवार, १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता, गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे संपन्न होईल. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी दिली.
ज्येष्ठ लेखक प्रा. शंकर निकम यांनी लिहिलेल्या ‘गैरसमजाच्या विळख्यातील नेहरू’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी होईल. तसेच पं. जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्रलढ्यात तुरुंगवास भोगताना लिहिलेल्या ‘GLIMPSES OF WORLD HISTORY’ आणि ’The Discovery of India’ या दोन पुस्तकांवर आधारित विशेष व्याख्याने होणार आहेत. ‘GLIMPSES OF WORLD HISTORY’ या पं. जवाहरलाल नेहरूंच्या पुस्तकावर पुण्याच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हरमेंटमधील सहयोगी प्राध्यापक परिमल माया सुधाकर आणि ‘The Discovery of India’ या पुस्तकावर दैनिक ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे यांची व्याख्याने होतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.


