Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedको-लिव्हिंग पोर्टफोलिओमधील विस्तारासाठी ट्राईब स्टेज तर्फे 2.8 दशलक्ष डॉलर्सची उभारणी

को-लिव्हिंग पोर्टफोलिओमधील विस्तारासाठी ट्राईब स्टेज तर्फे 2.8 दशलक्ष डॉलर्सची उभारणी

पुणे,17 नोव्हेंबर 2025 : भारतातील आघाडीची प्रिमियम मॅनेज्ड हॉस्पिटॅलिटी कंपनी असलेल्या ट्राईब स्टेज तर्फे 2.8 दशलक्ष डॉलर्स (24 कोटी रूपये) भांडवलीची उभारणी केली आहे.याचे नेतृत्व अर्थ व्हेंचर फंड आणि सहनेतृत्व रिव्हरवॉक होल्डींग्स ने केले.या राऊंडमध्ये व्हिवालडीज चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खन्ना,कृष्णा जैन आणि इतर एचएनआय सहभागी झाले होते.या नवीन भांडवलामध्ये तीन लक्झरी उपब्रँडसमध्ये ट्राईबला विस्तार करता येणार आहे.त्यामध्ये ट्राईब स्टुडंट अकोमोडेशन (हॉस्टेल्स),ट्राईब कम्युन (को-लिव्हिंग) आणि ट्राईब सुटसचा (एक्झिक्युटिव्ह अपार्टमेंटस) समावेश आहे.सध्या पुण्यात 650 बेडसह कार्यरत असून या वित्तीय वर्षात 1000 अतिरिक्त बेडसचा विस्तार करण्यात येणार आहे.तसेच हैदराबाद,बंगळुरू,गरूग्राम व पुणे येथे 25,000 बेडस पर्यंतचा विस्तार करण्यासाठी आराखडा आखण्यात आला आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments