Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्लबवन केईएम तर्फे टाईप 1 मधुमेही मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी शिबिराचे आयोजन

क्लबवन केईएम तर्फे टाईप 1 मधुमेही मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी शिबिराचे आयोजन

पुणे,17 नोव्हेंबर 2025 : जागतिक मधुमेह दिनानिमित्त व क्लबवन केईएम उपक्रमांतर्गत केईएम हॉस्पिटल,पुणेच्या डायबेटिस युनिट तर्फे टाईप 1 मधुमेही मुलांसाठी कर्जत येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 

यामध्ये एकंदर 15 ते 25 वयोगटातील एकंदर 60 टाईप 1 मधुमेहींनी सहभाग घेतला.याचा मूळ उद्देश एकमेकांशी संवाद वाढवणे,स्व व्यवस्थापन कौशल्य प्रदान करणे व प्रवासावेळी मधुमेहाच्या व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण देणे हे होते.

 

माऊंट एव्हरेस्ट सर करणारे संतोष दगडे यांच्या सत्राने या शिबिराची सुरूवात झाली.त्यांच्या प्रेरणादायी सादरीकरणामध्ये चिकाटी,शिस्त आणि कुठलेही आव्हान पेलण्यासाठी स्वत:वरचा विश्वास यावर त्यांनी भर दिला.

 

त्याचबरोबर शिबिरामध्ये दुसऱ्या दिवशी उल्हास नदी काठचा निसर्गरम्य फेरफटका त्याचबरोबर रॅपलिंग,रॉक क्लायबिंग,पोहणे यासारख्या साहसी उपक्रमांचा देखील सहभाग होता.डायबेटिस युनिटच्या सदस्यांबरोबर सहभागींनी संवाद साधला.दैनंदिन जीवनात मधुमेह व्यवस्थापनाबाबत येणाऱ्या समस्यांवर यात मार्गदर्शन करण्यात आले.हा उपक्रम म्हणजे सहभागींसाठी नवीन मैत्री,परस्पर संवाद आणि आत्मविश्वास वाढविणारे व्यासपीठ

ठरले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments