पिंपरी चिंचवड- महापालिकेच्या वतीने अखिल भारतीय सेवा निवृत्ती वेतनधारक दिनानिमित्त १७ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन..

तारां कित Avatar

पिंपरी, दिनांक १५ डिसेंबर २०२३ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘अखिल भारतीय सेवा निवृत्ती वेतनधारक दिन’ अर्थात ‘पेन्शनर्स डे’ चे आयोजन रविवार, १७ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात शहर अंतर्गत सर्व केंद्र, राज्य, रेल्वे, महानगरपालिका, शिक्षक संघटना यांच्या सेवानिवृत्तांचा सहभाग असून या दिवशी पेन्शन विषयाची देवाण घेवाण, अहवाल सादरीकरण, मान्यवरांचे मार्गदर्शन तसेच सत्कार समारंभाचा समावेश आहे.

‘पेन्शनर्स डे’ चे उद्घाटन चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे सकाळी १०.३० वाजता आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या होणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड सेवानिवृत्त सेवक परिषदेचे शहरात ८ हजार सदस्य असल्याची माहिती सेवानिवृत्त सेवक परिषदेचे अध्यक्ष प्रकाश जवळकर यांनी दिली आहे.

Tagged in :

तारां कित Avatar

More Articles & Posts