Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedसुश्रुत पुरस्कार सोहळा गुरुवारी (दि.२०) मंगल फाउंडेशन च्या वतीने आयोजन : आयुर्वेद...

सुश्रुत पुरस्कार सोहळा गुरुवारी (दि.२०) मंगल फाउंडेशन च्या वतीने आयोजन : आयुर्वेद व प्रॉक्टोलॉजी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान ; डॉ. मुकुल पटेल आणि डॉ. उमेश तगडे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

पुणे : मंगल फाउंडेशन च्या वतीने सुश्रुत पुरस्कार सोहळ्याचे आयोजन गुरुवार, दिनांक २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कोंढवा येथील इस्कॉन मंदिराच्या हॉल क्रमांक ४ मध्ये करण्यात आला आहे. आयुर्वेद आणि प्रॉक्टोलॉजी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा गौरव यावेळी होणार आहे. यंदाचा जीवन गौरव पुरस्कार गुजरात आयुर्वेद विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मुकुल पटेल आणि अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, आयुष मंत्रालय चे संयुक्त संचालक डॉ. उमेश तगडे यांना जाहीर झाला आहे. आयुर्वेद क्षेत्रातील त्यांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून हा सन्मान देण्यात येत आहे, अशी माहिती डॉ. मंगल फाउंडेशनचे डॉ. कुणाल कामठे यांनी दिली.

 

या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री माधुरी मिसाळ तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री डॉ. मनोरंजन साहू उपस्थित राहणार आहेत. याशिवाय कार्यक्रमाला आमदार योगेश टिळेकर, आमदार चेतन तुपे, जिल्हा प्रमुख जालिंदर कामठे, वरिष्ठ गुन्हेगारी वकील अॅड. प्रताप परदेशी, भोई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई, माजी महापौर प्रशांत जगताप, तसेच भाजप डॉक्टर सेलचे राज्याध्यक्ष डॉ. बाळासाहेब हरपळे उपस्थित राहणार आहेत. डॉ. कामठे पाइल्स क्लिनिकच्या सहकार्याने पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

डॉ. कुणाल कामठे म्हणाले, सुश्रुत रत्न पुरस्कारासाठी संजीवनी आयुर्वेद महाविद्यालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीनिवास के. बन्निगोल, अश्विनोउ हॉस्पिटल, माळशिरसचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण पाटील आणि श्री विश्वमूर्ती आयुर्वेद चिकित्सालय, पुणेचे संस्थापक डॉ. चंद्रकुमार देशमुख यांची निवड झाली आहे.

 

प्रॉक्टोलॉजी क्षेत्रातील असाधारण कार्याबद्दल यशोदीप पाइल्स हॉस्पिटल, चिखलीचे डॉ. गोपाल लोखंडे, बावधन मेडिकेअर सेंटर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील अंभोरे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. आयुर्वेद आयकॉन पुरस्कारासाठी गाडे आय हॉस्पिटल, मंचरचे डॉ. सचिन गाडे आणि आयुर्विंग्स हेल्थकेअर च्या संस्थापिका डॉ. पूजा कोहली यांची निवड झाली आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

—————————————————————–

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments