Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedरोहन कवडे ठरला देशभक्त केशवराव जेधे करंडकाचा मानकरी श्री शिवाजी मराठा...

रोहन कवडे ठरला देशभक्त केशवराव जेधे करंडकाचा मानकरी श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

पुणे: श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने आयोजित आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीयवक्तृत्व स्पर्धेत पुण्याच्या वारजे येथील संस्कार मंदिर महाविद्यालयाचा रोहन कवडेहा याने देशभक्त केशवराव जेधे करंडकाचा मानकरी ठरला. सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाचा तेजस पाटील याने द्वितीय तर कमिन्स कॉलेज ऑफ इंजीनियरिंगची तन्वीकांबळे हिने तृतीय क्रमांक पटकावला.

शुक्रवारपेठेतील शिवाजी मराठा सोसायटीत ही स्पर्धा झाली. स्पर्धेचे उदघाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.सदानंद भोसले यांच्याहस्ते तर पारितोषिक वितरण टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्याडॉ.राधिका इनामदार यांच्या हस्ते झाला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप,सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, नियामक मंडळ अध्यक्ष सत्येंद्र कांचन, सदस्य डॉ.सुनील जगताप,कमलताईव्यवहारे रघुनंदन जाधव, पद्माकर पवार, महादेव पवार,प्रभारी प्राचार्य डॉ. दिपाली पाटील उपस्थित होते.

डॉ.पांडुरंगकंद,डॉ.विजय लोंढे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. यश पाटील (बीके बिर्ला महाविद्यालय मुंबई),यशफुलवरे (फर्ग्युसन महाविद्यालय पुणे), शुभम राऊत (ए.एस.एम. महाविद्यालयचिंचवड), चैतन बावधाने (फर्ग्युसन महाविद्यालय पुणे),वृषभचौधरी (के. टी.एच.एम. कॉलेज नाशिक) यांनी अनुक्रमे ५ उत्तेजनार्थ पारितोषिकेपटकाविली. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला ११ हजार, द्वितीय क्रमांकाला ७ हजाराला, तृतीय क्रमांकाला ५ हजार आणि ५ उत्तेजनार्थक्रमांकाना प्रत्येकी १ हजार रोख आणि स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले.

डॉ. संतोष यादव, डॉ. अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रजनी जरांडे, डॉ,दीपक सुरवसे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments