Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहालक्ष्मी मंदिरातील उत्सव मूर्तींची पालखी मिरवणूक* *श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे...

महालक्ष्मी मंदिरातील उत्सव मूर्तींची पालखी मिरवणूक* *श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ब्रह्मोत्सवाचा समारोप*

*

पुणे : ब्रह्मोत्सवानिमित्त श्री महालक्ष्मी मंदिरातील उत्सव मूर्तींची पालखी मिरवणूक थाटात काढण्यात आली. श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती व श्री महाकाली देवीच्या मूर्तींची मंदिराच्या प्रांगणात मिरवणूक काढण्यात आली. पालखी सोहळ्यानंतर पुष्पउत्सव म्हणजेच फुलांची होळी हा अनोखा कार्यक्रम देखील मंदिरात मोठया उत्साहात पार पडला.

श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ब्रह्मोत्सवात मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, नारायण काबरा, तृप्ती अग्रवाल, रमेश पाटोदिया, निलेश लद्दड, मुरली चौधरी, राजेश सांकला यांसह विश्वस्त उपस्थित होते.

राजस्थान डिडवाना येथील अनंत श्री विभुषित जगतगुरु रामानुचार्य झालरिया पीठाधीपती पूज्य श्री श्री १००८ स्वामीजी घनश्यामाचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा पालखी सोहळा झाला. याशिवाय मंदिरात धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम झाले. सोने-चांदी पुष्पअर्पण करुन देवीचरणी सुख-शांती समृद्धीकरीता प्रार्थना करण्यात आली. सामाजिक कार्यक्रमांमध्ये शालेय विद्यार्थी शिष्यवृत्ती वाटप व उत्सव मूतीर्ची धान्यतुला करुन ते धान्य अनाथ मुलांच्या संस्थेस वाटप अशा उपक्रमांचा समावेश होता. धार्मिक कार्यक्रमामध्ये होम-हवन, महाअभिषेक हे कार्यक्रम देखील ब्रह्मोत्सवात पार पडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments