पुणे, दि.२४ नोव्हेंबर: रामेलेक्स प्रा.लि कंपनीचे संचालक व गीताई ह्युमनकाईंड डेवलपमेंट ट्रस्ट,पुणे चे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते राम बाबारावजी जोगदंड यांच्या पत्नी संध्या राम जोगदंड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ५५ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती राम व पुत्र सौरभ, जय आणि विजय असा परिवार आहे.
त्यांना श्रद्धांजली वाहतांना अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संध्या जोगदंड यांनी केवळ व्यावसायिकांच्या कल्याणासाठी काम केले नाही तर सामाजिक क्षेत्रातील त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. त्यांच्या निधनामुळे सामाजिक क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.


