पुणे, दि. २४ – भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात अनेक महत्त्वाची हस्तलिखिते आहेत. त्यापैकीच ‘सिद्धान्तराज’ या ग्रंथाच्या हस्तलिखितातून अत्यंत महत्त्वाची खगोलशास्त्रविषयक माहिती उपलब्ध झालेली आहे. प्राचीन भारतीयांना केवळ २७ नक्षत्रेच नव्हे तर ८४ ताऱ्यांचीही माहिती होती आणि त्या ताऱ्यांना खास भारतीय अशी नावेही दिलेली होती असे दिसून येते. आता मात्र हे तारे युरोपीय शास्त्रज्ञांनी आधिक काळात दिलेल्या नावांनी ओळखले जातात. बंगलोर येथील नेहरू तारांगणाच्या माजी संचालक डॉ. बी. एस्. शैलजा यांना ही प्राचीन शास्त्रीय माहिती “सिद्धान्तराज” या जुन्या हस्तलिखित ग्रंथातून उपलब्ध झालेली आहे, या सर्व विषयावर त्यांचे व्याख्यान उद्या मंगळवार (२५ नोव्हेंबर) सायंकाळी ५.३० वाजता भांडारकर संस्थेच्या फिरोदिया सभागृहामध्ये होणार आहे.
व्याख्यान सर्वांसाठी खुले आहे.
–


