Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedभय्याजी काणे जन्मशताब्दीची २९ नोव्हेंबरला सांगता🚩 🟪राष्ट्रीय स्वयंसेवक...

भय्याजी काणे जन्मशताब्दीची २९ नोव्हेंबरला सांगता🚩 🟪राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी यांची उपस्थिती 

 

 

▪️पुणे –पूर्वोत्तर भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी जीवन समर्पित करणारे भय्याजी काणे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता २९ नोव्हेंबरला (शनिवारी) होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुरेश तथा भय्याजी जोशी यावेळी उपस्थित राहणार आहेत. बीएमसीसी महाविद्यालयाच्या टाटा सभागृहात सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होईल. अशी माहिती पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानचे कार्यवाह जयवंत कोंडविलकर यांनी दिली.

 

शिक्षणाच्या माध्यमातून पूर्वोत्तर भारतात राष्ट्रीय एकात्मतेसाठी शंकर दिनकर काणे अर्थात भय्याजी काणे यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. २०२४-२५ हे त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. त्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले. या जन्मशताब्दी वर्ष सांगता कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून क्विकहील टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष कैलाश काटकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालकरवींद्रवंजारवाडकर उपस्थित राहणार आहेत. भय्याजी काणे यांनी पूर्वोत्तर भारतात अनेक शाळा उभ्या केल्या असून, राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्य करणारे कार्यकर्तेही तयार केले आहेत.

 

अधिक माहितीसाठी संपर्क –

श्रुती प्रणव मेहता 9028950200

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments