Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedसदाशिव पेठेत  ‘गुलमोहर’ गृहसंकुलाचे भूमिपूजन* *रामा एरंडे ग्रुपचा भव्य गृहप्रकल्प; भूमिपूजन...

सदाशिव पेठेत  ‘गुलमोहर’ गृहसंकुलाचे भूमिपूजन* *रामा एरंडे ग्रुपचा भव्य गृहप्रकल्प; भूमिपूजन जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न

 

 

पुणे :

 

पर्वती उड्डाणपुल, सदाशिव पेठ, सारसबाग लगतच्या मोक्याच्या ठिकाणी रामा एरंडे ग्रुपचा भव्य  गृहप्रकल्प ‘गुलमोहर’ आकार घेत आहे. या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

 

ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रामचंद्र (रामाशेठ)  एरंडे यांनी पुण्यात नोकरीसाठी येत बांधकाम व्यवसायात स्वकष्टाने आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. कोथरूड येथील ‘निरंजन अपार्टमेंट’ हा त्यांचा पहिला प्रकल्प. सन १९९६ पासून सुरू केला, त्यानंतरच्या प्रवासात त्यांनी २५ हून अधिक प्रकल्प पूर्ण करून सुमारे ८०० हून अधिक कुटुंबांना दर्जेदार घरे उपलब्ध करून दिली आहेत. आतापर्यंत ८ लाख चौरस फूट बांधकाम पूर्ण केले असून, सध्या १ लाख १८ हजार चौरस फूट काम सुरू आहे. पुढील काही महिन्यांत आणखी २ लाख चौरस फूट बांधकाम हाती घेण्यात येणार आहे. तसेच लवकरच कोथरूड, डहाणूकर कॉलनी येथे गृहप्रकल्प सुरू होत आहे.

 

या विकासयात्रेचा पुढचा टप्पा म्हणून सदाशिव पेठ, नीलायम चित्रपटगृहाशेजारी आणि पर्वती पुलाच्या सुरुवातीला सारसबागेजवळ असलेल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचे काम ‘गुलमोहर’ या नावाने रामा एरंडे ग्रुपकडे आले आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन शनिवारी संपन्न झाले.

 

कार्यक्रमाला भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार काशिनाथ दाते, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष एस. आर. कुलकर्णी, माजी महापौर अंकुश काकडे, ग्राहकपेठेचे एमडी सूर्यकांत पाठक, तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर, शिवाजी शिर्के, रामचंद्र (रामाशेठ)  एरंडे  व संपूर्ण कुटुंब आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

‘गुलमोहर’ प्रकल्पात १२ मजली भव्य इमारत उभी राहणार असून, २ आणि ३ बीएचकेचे प्रशस्त फ्लॅट उपलब्ध होणार आहेत. प्रकल्पातून एका बाजूला पेशवे उद्यानाचे तर दुसऱ्या बाजूला सारसबाग व पर्वती टेकडीचे सुंदर दृश्य अनुभवता येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments