28 नोव्हेंबर 2025 – भारतातील आघाडीच्या डिजिटल मनोरंजन प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या हंगामा ओटीटीने 2025 मध्ये सर्वात वेगाने वाढणाऱ्या हिंदी भाषिक ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणून आपली ओळख अधिक मजबूत केली. या वर्षी प्लॅटफॉर्मने थ्रिलर, क्राईम ड्रामा, सायकोलॉजिकल कथानक आणि बोल्ड नॅरेटिव्हजचा दमदार संच सादर केला. छोट्या गावातील रहस्यांपासून ते उच्चभ्रू समाजातील मनाचे खेळ, विविध कथा सांगण्याची हंगामा ओटीटीची ओळख यावर्षी आणखी बळकट झाली. नवीन चेहरे, प्रभावी अभिनय आणि यूनिकली इंडियन कथा यामुळे प्लॅटफॉर्मने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
खाली 2025 मध्ये हंगामा ओटीटीवर आलेल्या प्रमुख ऑरिजिनल्सची माहिती दिली आहे:
पर्सनल ट्रेनर – जानेवारी 2025
मुंबईच्या एलिट जिम कल्चरमध्ये घडणारी ही कथा टीना दत्ता यांच्या नेतृत्वातील एक डार्क आणि रोमांचक थ्रिलर आहे. मालिकेत नेहा ही विवाहित स्त्री आहे, जी आपल्या ट्रेनरसोबतच्या नात्यात गुंतत जाते आणि त्याच्या रहस्यमय मृत्यूनंतर फसवणूक, इच्छा आणि धोक्यांच्या जाळ्यात अडकते. गुलशन नैन आणि साहिब टागरा यांनी या वेगवान थ्रिलरमध्ये दमदार अभिनय केला आहे.
पती पत्नी और पडोसन – फेब्रुवारी 2025
एका लहान शहरातील सायकोलॉजिकल क्राईम ड्रामामध्ये युक्ती कपूर यांनी साकारलेली प्रतिभा आपल्या नवीन शेजारी सागरिका विषयी अनावर आकर्षण अनुभवते. तिच्या आयुष्यातील जुन्या गुपितांमुळे एक धोकादायक खेळ सुरू होतो. मोहित जोशी आणि चारू मेहरा यांच्या प्रभावी अभिनयासह ही मालिका ऑब्सेशन ,डिसेप्शन आणि मानवी गुंतागुंत यांचा वेध घेते.
कब क्यूं और कहां (एवरु इप्पुडू एकादा) – मार्च 2025
बेरहमीने झालेल्या काही हत्यांची मालिका सीबीआय च्या मोठ्या तपासाला सुरुवात करून देते. संशय एका प्रभावशाली उद्योजक विक्रम वर्मावर जात असताना नवनवीन खुलास्यांमुळे सत्य अधिक गुंतागुंतीचे बनते. धन्या बालकृष्णन, आशु रेड्डी आणि कौशल मंदा यांच्या ताकदीच्या अभिनयामुळे ही मालिका डिसेप्शन,ब्लॅकमेल आणि अनपेक्षित ट्विस्टसाठी ओळखली जाते.
खदान – मार्च 2025
एका खाणकामाच्या गावात घडणारी ही हौटिंग थ्रिलर आहे. अली गोनी यांनी साकारलेले इन्स्पेक्टर वीर प्रताप सिंग स्थानिक लोककथांशी, शापांशी आणि गाडलेल्या गुपितांशी निगडित हत्या उलगडतात. करणवीर बोहरा आणि रेबेका आनंद यांच्या भूमिकांनी कथेला अधिक खोली मिळते.
हसरते 2 – एप्रिल 2025
प्रचंड यश मिळालेल्या पहिल्या सीजननंतर हंगामा ची सर्वाधिक पाहिली जाणारी ऑरिजिनल मालिका पुन्हा परतली. महिलांच्या इच्छा, ओळख आणि अंतर्मनाचा शोध घेणाऱ्या सहा प्रभावशाली कथा या सीजनमध्ये आहेत. गुल्की जोशी, विवेक दहिया, नायरा एम बॅनर्जी, पूजा बॅनर्जी, आकांक्षा पुरी, परम सिंग, डॉली चावला आणि इतर मोठ्या कलाकारांच्या अभिनयाने हा सीजन पुन्हा एकदा चर्चेत आला.
मोना की मनोहर कहानियां – मे 2025
पूछताछ खोलीत घडणारी एक सायकोलॉजिकल थ्रिलर. सृष्टी रोडे यांनी साकारलेली मोना अनेक हत्यांची प्रमुख संशयित आहे. तिच्या कथांनी इन्स्पेक्टर पवन (अंकुर नय्यर)एक धोकादायक मानसिक खेळात अडकतो. डेझी बोपण्णा देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
जुडवा जाल – जून 2025
एक दमदार सहा भागांची हूडुनिट मालिका. मोनालिसा यांनी जुळ्या बहिणींची ड्युअल भूमिका साकारली आहे. अनामिका च्या संशयास्पद मृत्यूच्या तपासादरम्यान इन्स्पेक्टर कुणाल समोर प्रत्येक टप्प्यावर नवे रहस्य उलगडते.
बदास्स बेगम – जून 2025
मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये घडणारा एक ग्रिटी क्राईम ड्रामा. दिव्या अग्रवाल यांनी साकारलेली उर्वशी राजे गुन्हेगारी जगतातील स्वतःचे साम्राज्य उभे करते. अंकित गेरा आणि अक्षय डोगरा यांच्या भूमिकांसह ही मालिका पावर ,सर्वाइवल आणि एम्बिशन ची अनोखी कथा सांगते.
रोझ गार्डन – जुलै 2025
एखाद्या शांत पंजाबी गावातील दोन बहिणी आणि त्यांची रहस्यमय आई त्यांच्या भूतकाळामुळे त्रस्त आहेत. एक मिसिंग पर्सन केस संपूर्ण सत्य उघड करत त्यांच्या आयुष्यात उलथापालथ घडवतो. आकांक्षा पुरी, नियती फतनानी, मानिनी दे आणि नील समर्थ यांनी प्रभावी कामगिरी केली आहे.
लेट्स प्ले ब्लाइंड – ऑगस्ट 2025
एलिट गॅम्बलिंगच्या जगातील सायकोलॉजिकल थ्रिलर. तीन प्रभावशाली महिलांच्या खेळाला दोन अनोळखी व्यक्तींच्या प्रवेशाने प्राणघातक वळण मिळते. युक्ती कपूर, अक्षित सुखिजा, डॉली चावला, कंगना शर्मा, एमी एला आणि रिब्बू मेहरा यांच्या भूमिकांनी पावर ,सिडक्शन आणि रिव्हेंज यांचे नाट्य रंगवले आहे.
रिश्तों का चक्रव्यूह – सप्टेंबर 2025
एका गृहिणी मालती च्या धैर्याची कथा. गुलकी जोशी यांनी साकारलेली मालती आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी एका धोकादायक दुहेरी आयुष्यात प्रवेश करते. नवीना बोले, साकिब अयुब, रहुल सुधीर आणि राहात शाह काझमी यांच्या दमदार भूमिकांसह ही सस्पेन्स आणि भावना यांचे मिश्रण असलेली मालिका आहे.
ये है सनक – ऑक्टोबर 2025
इच्छा, फसवणूक आणि कुटुंबाला उद्ध्वस्त करणाऱ्या भावनांची सायकोलॉजिकल कथा. शरद मल्होत्रा, शिवांगी वर्मा, अंकित राज आणि सिमरन सचदेवा यांच्या अभिनयाने ही मालिका उच्च भावनिक स्टेक्स असलेला अनुभव देते.
डर्टी स्कॅम्स – नोव्हेंबर 2025
पाच स्वतंत्र स्कॅम स्टोरीज असलेली अँथॉलॉजि मालिका. महिला नायिकांच्या नेतृत्वात बनलेली ही मालिका डिसेप्शन ,रिस्क्स आणि स्मार्ट नॅरेटिव्हजची अनोखी सांगड घालते. पवित्रा पुनिया, पूजा बॅनर्जी, अलिशा पनवार, इशिता गांगुली, दिपंकना दास, रुशद राणा, इम्रान नजीर खान, अंकित राज आणि अक्षया शेट्टी यात दिसतात.
विनी की किताब – डिसेंबर 2025
गावातील बिट्रायल ,पॅशन आणि सेल्फ -डिस्कवरी ची कथा. विनी च्या गुपित कल्पनांवर आधारित एक मासिक तिच्या नकळत प्रकाशित होते आणि तिचे आयुष्य बदलून जाते. ती एका कंटाळलेली गृहिणी पासून एक धाडसी लेखिका बनण्याचा प्रवास सुरू करते. योगेंद्र
विक्रम सिंग आणि मानसी जैन महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.


