Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedनगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक, 2025 मतदान व मतमोजणी परिसरात 100...

नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक, 2025 मतदान व मतमोजणी परिसरात 100 मीटर प्रतिबंधित क्षेत्र- जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे, दि. 28 : पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक, 2025 दरम्यान शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 अन्वये आदेश जारी केला आहे.

 

या आदेशानुसार मतदान व मतमोजणीच्या ठिकाणापासून 100 मीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रात मतदारांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेश बंदी असून मतदान केंद्रावर 2 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 पासून मतदान पूर्ण होईपर्यंत तर मतमोजणी केंद्रावर 3 डिसेंबर रोजी सकाळी 6:00 वाजेपासून मतमोजणी संपेपर्यंत निर्बंध लागू राहणार आहेत.

 

प्रतिबंधित परिघात वाणिज्यिक आस्थापना, मंडपे, दुकाने, फेरीवाले तसेच मोबाईल, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट, ध्वनिक्षेपक व विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना मात्र सूट देण्यात आली आहे.

 

या आदेशाचे उल्लंघन केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम व भारतीय न्याय संहिता-2023 च्या कलम 223 अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments