हे हॉस्पिटल ‘हेल्थकेअर सस्टेनेबिलिटी’ (आरोग्यसेवेतील शाश्वतता) या क्षेत्रासाठी ‘जॉइंट कमिशन इंटरनॅशनल’ (JCI) द्वारे विशेष मान्यता प्राप्त करणारे भारतातील पहिले आणि जगातील पाचवे हॉस्पिटल बनले आहे.
~ या सर्टिफिकेशनने सिद्ध केले आहे की, मुंबईचे हे रुग्णालय सामान्य संचलनात मजबूत आणि लवचिक आहेच, शिवाय पर्यावरण बदलांशी संबंधित धोके टाळण्यासाठी जागतिक स्तरावरील मानकांचे पालन करते, त्यामुळे या क्षेत्रातील एक आघाडीची संस्था बनले आहे. ~
मुंबई, 1 नोव्हेंबर २०२५: कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने जाहीर केले आहे की, त्यांच्या मुंबईतील रुग्णालयाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित असलेल्या जॉइंट कमिशन इंटरनॅशनलने इंटरनॅशनल हॉस्पिटल फेडरेशनच्या जिनेव्हा सस्टेनेबिलिटी सेंटरच्या सहयोगाने “हेल्थकेअर सस्टेनेबिलिटी प्रोग्राम”साठी ‘सर्टिफिकेट ऑफ डिस्टिंक्शन’ने सन्मानित केले आहे. हा प्रतिष्ठित आणि अत्यंत मौल्यवान सन्मान प्राप्त करून, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय या कठोर जागतिक निकषांची पूर्तता करणारे भारतातील पहिले आणि जगातील पाचवे रुग्णालय बनले आहे. ही कामगिरी रुग्णालयाच्या शाश्वत उपक्रमांप्रती आणि पर्यावरणपूरक आरोग्य सेवांच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.
आरोग्यसेवा क्षेत्र हे जगातील सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करणाऱ्या पहिल्या ५ उद्योगांपैकी एक आहे. आजच्या युगात, जागतिक आरोग्य प्रणाली त्यांच्या कामकाजातील जोखीम कमी करण्यासाठी आणि हवामानाशी संबंधित अडथळ्यांचा मुकाबला करण्यासाठीची लवचिकता मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा परिस्थितीत, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलला मिळालेले हे प्रतिष्ठित प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. हे प्रमाणपत्र कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलसारख्या जागतिक रुग्णालयाकडून अपेक्षित असलेल्या जागतिक दर्जाच्या मानकांनुसार आहे. या अपेक्षांमध्ये ‘टास्क फोर्स ऑन क्लायमेट-रिलेटेड फायनान्शिअल डिस्क्लोजर्स’ (TCFD) आणि ‘इंटरनॅशनल सस्टेनेबिलिटी स्टॅंडर्ड्स बोर्ड’ (ISSB) यांसारख्या चौकटींखाली आरोग्यसेवा संस्थांनी हवामानाशी संबंधित जोखमींची माहिती जाहीर करण्यावर वाढता भर देणे समाविष्ट आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल ची ही कामगिरी दर्शवते की रुग्णालय केवळ वैद्यकीय सेवांमध्येच नव्हे, तर शाश्वतता (सस्टेनेबिलिटी) आणि पर्यावरणीय जबाबदारीच्या जागतिक मानकांचे पालन करण्यात देखील उत्कृष्ट कामगिरी बजावत आहे.
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक, डॉ. संतोष शेट्टी यांनी आर्थिक आणि धोरणात्मक महत्त्वावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “हे सर्टिफिकेशन आमच्या मूळ विश्वासाचे प्रतिबिंब आहे की शाश्वततेमुळे अधिक चांगले क्लिनिकल परिणाम मिळतात आणि संचालन कामगिरी अधिक सक्षम होते. आमचा २०३० च्या सस्टेनेबिलिटी रोडमॅपमध्ये ऊर्जा कार्यक्षमता, जल व्यवस्थापन, उत्सर्जन कमी व्हावे यासाठी उपयुक्त सामग्री आणि हवामानाला तोंड देऊ शकणाऱ्या पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या गुंतवणुकींचा उद्देश दीर्घकालीन खर्चाचा दबाव कमी करणे, रुग्णांची सुरक्षा सुधारणे आणि वाढत्या हवामान बदलाच्या अस्थिरतेचा सामना करणाऱ्या शहरात व्यावसायिक निरंतरता मजबूत करणे हा आहे.”
जेसीआय-जीएससी कार्यक्रम विशेषतः अशा रुग्णालयांना मान्यता देतो जे बोर्ड स्तरावर पर्यावरणीय जोखीम प्रशासनाचा समावेश करतात आणि उत्सर्जन, कचरा, पाणी बचत आणि पुरवठा-साखळीच्या स्थिरतेला व्यवसाय जोखीम व्यवस्थापनात समाविष्ट करतात. हे मजबूत अंतर्गत नियंत्रणे आणि दूरदर्शी व्यवस्थापनाप्रती असलेली बांधिलकी दर्शवते.
भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे, ज्यामुळे पायाभूत सुविधांवर मोठा दबाव येत आहे. देशाला हवामान बदलाप्रती वाढत्या संवेदनशीलतेचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालयीन प्रणालींवरील ताण वाढत आहे. राष्ट्रीय हवामान बदल आणि मानव आरोग्य कार्यक्रमासारख्या राष्ट्रीय कार्यक्रमांमुळे उत्सर्जन अहवाल, चक्रीयता आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत अपेक्षा वाढल्या आहेत. यामुळे आरोग्य सेवा क्षेत्राला हवामानासाठी अधिक मजबूत आणि लवचिक पद्धती स्वीकारण्यास प्रोत्साहन मिळत आहे. हवामानामुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्यांमुळे होणारे खर्च २०५० पर्यंत दक्षिण आशियामध्ये दरवर्षी ३६ अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे हे बदल अत्यावश्यक बनले आहेत. जरी अनेक भारतीय रुग्णालये नेतृत्त्व स्तरावर पर्यावरणीय प्रशासन समाविष्ट करण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात असली तरी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने जागतिक ईएसजी (पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय) फ्रेमवर्कला अनुरूप होणे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्यांचे जेसीआय सस्टेनेबिलिटी सर्टिफिकेशन सध्याच्या राष्ट्रीय निकषांच्या पलीकडे जाऊन त्यांची परिपक्वता पातळी दर्शवते. त्यांनी उत्सर्जन, कचरा, पाणी आणि पुरवठा साखळीची स्थिरता यांचा समावेश मुख्य जोखीम व्यवस्थापनात केला आहे. या संदर्भात, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल या प्रदेशातील आघाडीचे रुग्णालय म्हणून उदयास आले आहे, ही बाब दर्शवते की संसाधने कमी असतानाही जबाबदारीचे भान राखून प्रदान करण्यात येणाऱ्या आणि भविष्यासाठी सज्ज आरोग्य सेवा देता येतात.


