मुंबई, 27 नोव्हेंबर 2025: कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडील (कोटक लाइफ) असेट अंडर मॅनेजमेंट (AUM) रु. 1 लाख कोटीवर पोहचला असून कंपनीने आपल्या वाटचालीत अतिशय महत्वाचा टप्पा पार् केला आहे. यातून कंपनीची निरंतर सुरु असलेली वाढ, पॉलिसीधारकांच्या असेटचे अतिशय विवेकपुर्ण रितीने व्यवस्थापन आणि ग्राहक तसेच भागीदारांचा कोटक लाईफवर असलेला विश्वास प्रतिबिंबित झाला आहे.
कंपनीने पार् केलेल्या या महत्वाच्या टप्प्याबद्दल बोलताना कोटक लाईफचे व्यवस्थापकीय संचालक श्री. महेश बालसुब्रमण्यम म्हणाले: “आमच्या वाटचीलीतील पंचविसाव्या वर्षात रु. 1 लाख कोटीचा AUM ओलांडणे, हा केवळ महत्वाचा आर्थिक टप्पाच नव्हे तर आमच्या ग्राहकांनी आणि भागीदारांनी आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाला मिळालेली भरभक्कम पोचपावती आहे. नाविन्यपूर्ण उत्पादने, डिजिटल-फर्स्ट पर्याय आणि ग्राहकांच्या गरजांवर अढळ लक्ष केंद्रित करत शाश्वत मूल्य निर्मितीसाठी कोटक लाईफ वचनबद्ध आहे. भारतात लाईफ इन्शुरन्सच्या भविष्याला आकार देण्यासाठी आम्ही केलेल्या संकल्पाला या कामगिरीमुळे भक्कम पाठबळ मिळाले आहे.”
कोटक लाईफच्या वाढीला संरक्षण, बचत, युनिट-लिंक्ड आणि अॅन्युइटी यासारख्या वैविध्यपूर्ण उत्पादनांचा आधार लाभलेला आहे. सुरक्षितता, स्थिरता आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मिती यावर गुंतवणूकीचा पाया उभा राहिलेला असून धोरणांची शिस्तबद्ध अंमलबजावणी करत पॉलिसीधारकांच्या निधीची योग्य प्रकारे गुंतवणूक आणि जोखीम व्यवस्थापनावर कोटक लाईफने आपले लक्ष अतिशय बारकाईने केंद्रीत केलेले आहे. मार्च 2010 पासून, कोटक लाईफच्या AUMमध्ये दरवर्षी 19 टक्के चक्रवाढ दराने भर पडत चालली आहे. यातून फंड परफॉर्मन्समधील सातत्य दिसून येते आणि पॉलिसीधारकांचा कंपनीवरील विश्वाससुध्दा वारंवार प्रकट होतो.
86.26%1 या कंझर्व्हेशन रेशोमधून दिसते की कोटक लाईफ ग्राहक टिकूवून ठेवण्यात अतिशय यशस्वी ठरली आहे आणि विमाधारकांचा दीर्घकालीन सहभागही यातून स्पष्ट होतो. कंपनीने 5 कोटींहून अधिक लोकांचे लाईफ* सुरक्षित केले आहे. कंपनीचा इंडिव्हीज्यूअल क्लेम सेटलमेंट रेसहो 98.6%2 आणि ग्रुप क्लेम्स सेटलमेंट रेशो 99.63%2 आहे. यातून दाव्यांची पूर्तता करण्याची आणि सर्वात जास्त गरज असताना पॉलिसीधारकाला आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याची कंपनीची क्षमता देखील अधोरेखित झा
ली आहे.


