Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारताच्या सर्वाधिक लोकप्रिय जिंगलसाठी आनंद करीर यांच्या बोईंग ब्रँडव्हर्टायझिंगने केली एका नवीन...

भारताच्या सर्वाधिक लोकप्रिय जिंगलसाठी आनंद करीर यांच्या बोईंग ब्रँडव्हर्टायझिंगने केली एका नवीन धाडसी अध्यायाची रचना! निरमाच्या नवीन अॅडव्हान्स टी व्ही सी मधून बोईंग ब्रँडव्हर्टायझिंगने सर्जनशीलतेला एक नवीन दिशा दिली आहे.

डिसेंबर १५, २०२५ :

 

सुप्रसिद्ध अॅड-मॅन आणि चित्रपटकर्ते, आनंद करीर, यांची क्रिएटिव एजन्सी, बोईंग ब्रँडव्हर्टायझिंगने, नवीन निरमा अडव्हान्स टी व्ही सी ची निर्मिती केली आहे. केरळ, हिमाचल प्रदेश आणि पंजाब इथे तब्बल सोळा दिवसांच्या सखोल चित्रीकरणानंतर तयार झालेल्या या नवीन फिल्ममधील तुम्हाला गुंतवून टाकणाऱ्या कथाकथनामध्ये, शिस्तबद्ध मांडणीमध्ये, आणि भव्य दृश्यात्मक अनुभवामध्ये, बोईंग ब्रँडव्हर्टायझिंगचा ठसा ठळकपणे दिसून येतो.

 

नवीन जाहिरातीमध्ये, मूळच्या जिंगलमधले ते अविस्मरणीय गीत तसेच ठेवून, त्यात नवीन शब्द आणि नवी हूक लाइन वापरण्यात आली आहे : “तुझसा ही निरमा है”. ते रमणीय आठवणीतील गीत आणि आधुनिकता यांचं अनोखं मिश्रण सादर करण्यासाठी, बोईंग ब्रँडव्हर्टायझिंगने दोन जबरदस्त स्वरांना एकत्र आणलं – दलेर मेहंदी आणि वैशाली सामंत – ज्यांच्या विभिन्न पण तरीही एकमेकांना पूरक अशा शैलींमुळे या गाण्यातील आंतरिक भावना आणि रुबाब अधिकच वृद्धिंगत झाला आहे.

 

फिल्म पहाण्यासाठी लिंक : https://www.youtube.com/watch?v=0ixT-7nHARc

 

ही जाहिरात मोहीम म्हणजे बोईंगच्या अंतर्भूत दृढ विश्वासाचं प्रतीक आहे : अशा गोष्टी रचायच्या ज्या ताज्या, प्रचलित आणि भावनिक दृष्ट्या सजीव असतील. गेल्या कित्येक वर्षांत, एजन्सीने पॉलिसीबजार डॉट कॉम, पैसाबझार डॉट कॉम, निरमा ब्युटी सोप, निरमा सॉल्ट, फिनोलेक्स फॅन्स, फिनोलेक्स स्विचेस,लिव्हप्यूअर वॉटर प्यूरिफायर, अँकर रिएल्टी, किचन एक्सप्रेस स्पाइसेस, अमेझोन इंडिया, विठोबा आयुर्वेदिक ओरल केअर, यशदा रिएल्टी, आणि पॅपिलॉन पर्सनलाइझ्ड फर्निचर अशा कित्येक नामांकित ब्रँड्ससाठी लक्षवेधी जाहिरातींच्या रचना केल्या आहेत.

 

या नवीन जाहिरात मोहिमेबद्दल बोलताना, बोईंग ब्रॅंडव्हर्टायझिंगचे संस्थापक आणि प्रमुख क्रिएटीव्ह डायरेक्टर, आनंद करीर म्हणाले, “गेल्या दोन वर्षांच्या अविरत मेहनतीनंतर, कित्येक रात्री उशीरापर्यंत,अखंड चर्चांमधून, आम्ही एका अशा स्वप्नाचा पाठलाग करत होतो जे कधीच भंगलं नाही.. आणि त्यातून आता आम्ही आमची नवीन निरमा अॅडव्हान्स फिल्म जगासमोर आणत आहोत. निरमा हा फक्त एक ब्रँड नाही, ती एक अशी जाणीव आहे जिच्याबरोबर आम्ही लहानाचे मोठे झालो. त्यामुळे, अशा या लोकप्रिय जिंगलसाठी काम करायला मिळणं ही माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी एक प्रतिष्ठेची आणि तितकीच जबाबदारीचीही गोष्ट होती. त्यामुळे, आम्ही बोईंग ब्रँडव्हर्टायझिंग मध्ये, एकामागून एक अशी कित्येक व्हर्जन्स ( आवृत्त्या) लिहीत गेलो. आम्ही वेगवेगळ्या संगीतकारांबरोबर ५ – ६ वेगवेगळी जिंगल कट्स रेकॉर्ड केली, आणि त्यातून आम्हाला हे एक मिळालं जे ऐकतानाच अंगावर रोमांच उभे राहिले. या फिल्मसाठी आम्ही १६ दिवस चित्रीकरण करत होतो, केरळ, हिमाचल आणि पंजाबमध्ये, भारताच्या दैनंदिन जीवनातलं सार आम्ही त्यातून नेमकं टिपलं आहे. आणि, सर्वात शेवटी, आयसिंग ऑन द केक म्हणजे, हे दोन स्वर ज्यांनी या जिंगलमध्ये प्राण ओतला आणि ते जास्त रुबाबदार केलं – दलेर मेहंदी जे आजच्या तरुणाईचा आवाज आहेत आणि वैशाली सामंत, ज्यांच्या आवाजातला तो प्रेमळ गोडवा — जे मूळ जिंगलचेही ठळक घटक होते. “तुझसा ही निरमा है” ही नवीन हूक लाइन या फिल्मचं सार नेमकेपणाने टिपते.

 

“बोईंगमध्ये आम्ही हे मानतो की, गोष्टी अशा असायला हव्यात ज्या हृदयं जिंकून घेतील, नुसती बक्षीसं नाही! मग, ती अविस्मरणीय अशी फिनोलेक्स फॅन जाहिरात असेल ज्यात एक फॅन लोणच्याची बरणी अंतराळात घेऊन जातो किंवा माझी मराठी फिल्म, “आपडी थापडी” असेल, मी नेहमीच प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीला आव्हान देण्याचा प्रयत्न करतो पण तेही मानवी भावनांच्या भक्कम पायावर उभं राहून! हेच तत्त्वज्ञान या नवीन निरमा फिल्ममध्येही आहे”

 

या नवीन फिल्ममधून, निरमाने पुन्हा एकदा संगीत, कथाकथन आणि भाग्यशाली परंपरा आणि दूरदृष्टि लाभलेल्या एका सर्जनशील भागीदारीच्या माध्यमातून कित्येक पिढ्यांना एकत्र जोडलं आहे. आणि हे सगळं करताना ब्रँड्सना त्यांची क्षमता पूर्णत्वाने साध्य करण्यासाठी मदत करण्याचं मिशन, बोईंग ब्रँडव्हर्टायझिंग सातत्याने पुढे नेत आहे – सच्चेपणाने, कल्पनाशक्तीच्या जोरावर आणि पूर्णपणे प्राण ओतून!

 

अधिक माहितीसाठी : https://boing.agency/

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments