पुणे, 1 मार्च, 2024: इन्फोसिस यांच्या वतीने आयोजित सातव्या “इन्फोसिस कप 2023-24” आंतर आयटी क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत इन्फोसिस संघाने तिसरा, तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, डॉइश बँक संघांनी दुसरा विजय नोंदवला.
इन्फोसिस मैदान, हिंजवडी, फेज 2 या ठिकाणी दर आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवार या दिवशी सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात सागर बिरदवडे 1-37 व 90धावा) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर इन्फोसिस संघाने टेक महिंद्रा संघाचा 6 गडी राखून पराभव करत विजयाची हॅट्रिक नोंदवली. प्रथम फलंदाजी करताना टेक महिंद्रा संघाने 20 षटकात 5बाद 169धावा केल्या. यात इशान ठाकूर नाबाद 61, सय्यद पटेल 32, अमितोष निखार 27 यांनी धावा केल्या. इन्फोसिसकडून कमलेश रावलानी(2-38), सागर बिरदवडे(1-37) यांनी सुरेख गोलंदाजी केली. हे आव्हान इन्फोसिस संघाने 16 षटकात 4बाद 173धावा करून पूर्ण केले. यात सागर बिरदवडेने गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीतही कमाल दाखवत 46चेंडूत 10चौकार व 3 षटकारासह 90 धावा काढून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला हर्षद टिकडेने 52 धावा, संदिप संघाय 14 धावा काढून साथ दिली.
दुसऱ्या सामन्यात दिपक शर्मा(3-13)च्या भेदक गोलंदाजीसह विक्रांत बांगर नाबाद 64 धावांच्या खेळीच्या जोरावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस संघाने दसॉल्ट सिस्टीम संघाचा 7 गडी राखून पराभव केला. अन्य लढतीत तरण दीप सिंग(3-20) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर डॉइश बँक संघाने मास्टरकार्ड संघाचा 9 गडी राखून पराभव केला.
निकाल: साखळी फेरी:
टेक महिंद्रा: 20 षटकात 5बाद 169धावा(इशान ठाकूर नाबाद 61(51,9×4), सय्यद पटेल 32(17,3×4,1×6), अमितोष निखार 27, कमलेश रावलानी 2-38, सागर बिरदवडे 1-37)पराभुत वि.इन्फोसिस: 16 षटकात 4बाद 173धावा(सागर बिरदवडे 90(46,10×4,3×6), हर्षद टिकडे 52(33,5×4,1×6), संदिप संघाय 14, नदीम खान 3-33); सामनावीर-सागर बिरदवडे; इन्फोसिस संघ 6 गडी राखून विजय;
दसॉल्ट सिस्टीमः 16.1 षटकांत सर्वबाद 97धावा(अंशुल गोस्वामी 22(17,4×4), विकास कुमार 21, भूषण पाटील 13, दिपक शर्मा 3-13, पूरब गजीनकर 3-17, सुनील बाबर 2-14, सागर दुबे 2- 20) पराभुत वि.टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस: 13.5 षटकात 3बाद 99धावा(विक्रांत बांगर नाबाद 64(51,8×4,2×6), साईनाथ शिंदे 16, प्रवीण इंगळे 11, संग्राम पाटील 1-12); सामनावीर – दिपक शर्मा; टीसीएस संघ 7 गडी राखून विजयी;
मास्टरकार्ड: 19.1 षटकात सर्वबाद 86धावा(पंकज सिंग 29, आशुतोष पाटील 29, तरण दीप सिंग 3-20, अमोल माने 3-14)पराभुत वि.डॉइश बँक:8.4 षटकात 1बाद 88धावा(मधू कामत नाबाद 61(34,11×4), पंकज लालगुडे नाबाद 20(13), रमाकांत शिंदे 1-22);सामनावीर – तरण दीप सिंग; डॉइश बँक संघ 9 गडी राखून विजयी


