पुणे, 1 मार्च 2024: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए मानांकन एसेस स्पोर्ट्स अरेना ब्रॉन्झ सिरिज 2024स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील ही स्पर्धा 2 ते 4 मार्च 2024 या कालावधीत एसेस स्पोर्ट्स अरेना, बॉस्टन स्कुल या ठिकाणी होणार आहे.
स्पर्धेत एकूण 131खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेतील विजेत्या व उप विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी सरदार ठाकूर यांची स्पर्धा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली असल्याचे स्पर्धा संचालक होजेफा हकीम यांनी सांगितले.


