पुणे, 1 मार्च 2024: फुटबॉल असोसिएशन ऑफ पुणे यांच्या तर्फे व इलाईट स्पोर्ट्स इव्हेंट्स यांच्या संलग्नतेने आयोजित श्री गुरु गोबिंद सिंग चॅलेंजर्स करंडक फुटबॉल स्पर्धेत सीएमएस फाल्कन ब, पोचर्स, स्वराज एफसी, स्ट्रायकर्स एफसी, एफसी शिवनेरी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
खराडी येथील ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या हॉटफुट फुटबॉल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत बाद फेरीत सीएमएस फाल्कन ब संघाने सीओईटी एफसी संघाचा 6-1 धुव्वा उडवत शानदार सुरुवात केली. सीएमएस फाल्कन ब संघाकडून अमन फिलिप(11,39 मि.), पृथ्वीराज माने(20,41 मि.)यांनी दोन गोल, केतन भोसले(17 मि.), राजीव राज(36 मि.)यांनी प्रत्येकी एक गोल केला. सीओईटी एफसीकडून सुजन धुरी(34 मि.)एक गोल केला.
दुसऱ्या चुरशीच्या लढतीत पोचर्स संघाने व्हिशिअस एफसी संघाचा टायब्रेकरमध्ये 6-4 असा पराभव केला.पोचर्सकडून अनिकेत भारसाकळे(24मि.), आदित्य खाडे(36मि.) यांनी तर व्हिशिअस एफसीकडून अनुज सुतार(29मि.),आदित्य लोन (40मि.) यांनी गोल प्रत्येकी एक गोल केल्यामुळे निर्धारित वेळेत सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. सामना बरोबरीत सुटल्यामुळे टायब्रेकरपद्धतीचा अवलंब करण्यात आला. टायब्रेकरमध्ये विजयी संघाकडून रोहन मुळे, मयूर मुळे, अनिकेत भारसाकळे, सिलरॉय फर्नांडिस यांनी गोल केले.
अन्य लढतीत सार्थक 10 मि., वॉल्टर सोलोमन 37 मि., सार्थ कांबळेचा 50 मि. यांनी केलेल्या प्रत्येकी एक गोलाच्या जोरावर स्वराज एफसी संघाने ॲव्हेंजर्स संघाचा 3-1 असा पराभव करून आगेकूच केली. स्ट्रायकर्स एफसी संघाने जोसेफ अकादमी संघाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. स्ट्रायकर्स एफसीकडून मिलिंद गायकवाड(7 मि.), दिनेश सातकर(15मि.), जॉर्ज पिल्ले(25मि) यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
निकाल: बाद फेरी:
स्ट्रायकर्स एफसी: 3 (मिलिंद गायकवाड 7 मि., दिनेश सातकर 15 मि., जॉर्ज पिल्ले 25 मि.) वि.वि.जोसेफ अकादमी: 0;
एफसी शिवनेरी: 3 (सुनील तमंग 1 मि., सादिक शफी 19 मि., सागर जाधव 45 मि.) वि.वि.स्पोर्टझिला: 0;
सीएमएस फाल्कन ब: 6(अमन फिलिप 11,39 मि., केतन भोसले 17 मि., पृथ्वीराज माने 20,41 मि., राजीव राज 36 मि.)वि.वि.सीओईटी एफसी: 1 (सुजन धुरी 34 मि.)
पोचर्स: 6(अनिकेत भारसाकळे 24मि., आदित्य खाडे 36मि.,रोहन मुळे, मयूर मुळे, अनिकेत भारसाकळे, सिलरॉय फर्नांडिस) टायब्रेकरमध्ये वि.वि.व्हिशिअस एफसी: 4(अनुज सुतार(पेनल्टी किक) 29मि., आदित्य लोनी 40मि., अनुज सुतार, टॉम फर्जा)(गोल चुकविला-आदित्य लोनी); पूर्ण वेळ: 2-2;
स्वराज एफसी: 3 (सार्थक 10 मि., वॉल्टर सोलोमन 37 मि., सार्थ कांबळेचा 50 मि.) वि.वि.ॲव्हेंजर्स: 1 (कुशाल सिंग 2 मि.)


