Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedOasis Fertility आणि Project Nanhi Kali यांची भागीदारी 100 वंचित मुलींच्या...

Oasis Fertility आणि Project Nanhi Kali यांची भागीदारी 100 वंचित मुलींच्या शिक्षणासाठी ‘Happy New Family’ मोहिमेअंतर्गत पुढाकार

पुणे | भारतातील आघाडीची प्रजनन आरोग्य सेवा संस्था Oasis Fertility हिने Project Nanhi Kali या उपक्रमासोबत भागीदारी करत 100 वंचित मुलींच्या शिक्षणासाठी मदत जाहीर केली आहे. Project Nanhi Kali हा K. C. Mahindra Education Trust (KCMET) आणि Naandi Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जाणारा देशव्यापी शिक्षण उपक्रम आहे.

 

 

 

ही घोषणा Oasis Fertility च्या ‘Happy New Family’ या मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग असून, ही मोहीम 2026 मध्ये पालकत्वाचा प्रवास सुरू करू इच्छिणाऱ्या दाम्पत्यांना योग्य माहिती, जागरूकता आणि वेळेवर उपचारांसाठी प्रोत्साहित करते. या मोहिमेच्या माध्यमातून Oasis Fertility ने नव्या आयुष्याच्या सुरुवातीचा आनंद समाजाशी जोडण्याचा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे.

 

 

 

या उपक्रमांतर्गत Oasis Fertility निवडलेल्या 100 Nanhi Kali लाभार्थी मुलींच्या संपूर्ण शैक्षणिक वर्षाचा खर्च उचलणार आहे. यामध्ये डिजिटल शिक्षण सुविधा, आर्थिक साक्षरता, जीवन कौशल्य विकास, क्रीडा व नेतृत्व प्रशिक्षण यांचा समावेश आहे. तसेच प्रत्येक मुलीला Nanhi Kali किट देण्यात येणार असून, त्यात दप्तर, बूट, सॅनिटरी पॅड्स, स्टेशनरी, टी-शर्ट्स आदी आवश्यक साहित्य समाविष्ट असेल, जेणेकरून त्या सन्मानाने आणि आत्मविश्वासाने शिक्षण घेऊ शकतील.

 

 

 

या भागीदारीद्वारे Oasis Fertility चा असा विश्वास अधोरेखित होतो की सशक्त समाजाची पायाभरणी सशक्त महिला आणि मुलींपासून होते. मूलभूत शिक्षणाला पाठबळ देऊन सामाजिक असमानता कमी करणे आणि मुलींना त्यांची संपूर्ण क्षमता विकसित करण्याची संधी देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

 

 

 

डॉ. दुर्गा जी. राव, सहसंस्थापक व वैद्यकीय संचालक, Oasis Fertility म्हणाले,“विज्ञान आयुष्य घडवते, पण संधी आयुष्य बदलते. अनेक मुलींना शिक्षणाची संधी मिळत नाही. Project Nanhi Kali सोबतच्या या भागीदारीतून आम्ही पात्र मुलींना शिक्षण, आत्मविश्वास आणि उज्ज्वल भविष्याची संधी देत आहोत. शिक्षण हे सशक्तीकरणाचे सर्वात प्रभावी साधन आहे.”

 

 

 

पुष्कराज शेनॉय, CEO, Oasis Fertility म्हणाले, “IVF व प्रगत प्रजनन उपचारांद्वारे जन्मलेल्या मुलांचा Oasis Ayushman Scholarship अंतर्गत सन्मान केल्यानंतर, हा उपक्रम ‘Happy New Family’ मोहिमेचा सामाजिक विस्तार आहे. मुलींच्या शिक्षणात गुंतवणूक करणे म्हणजे समाजाच्या दीर्घकालीन प्रगतीत गुंतवणूक करणे.”

 

 

 

स्वाती श्रीवास्तव, व्हाइस प्रेसिडेंट – पार्टनरशिप्स, Project Nanhi Kali म्हणाल्या,“Oasis Fertility कडून मिळणाऱ्या पाठबळामुळे अधिकाधिक वंचित मुलींना सन्मानाने आणि सातत्याने शिक्षण घेण्याची संधी मिळेल.”

 

 

 

डॉ. निलेश बालकवाडे, Regional Medical Head – Oasis Fertility यांचे मत: “पालकत्वाच्या प्रवासाची सुरुवात आणि मुलींच्या शिक्षणाला पाठबळ देणे, हे समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. Oasis Fertility मध्ये आम्ही उपचारांसोबत सामाजिक जबाबदारीही तितक्याच प्रामाणिकपणे स्वीकारतो. Project Nanhi Kali सोबतचा हा उपक्रम मुलींच्या सशक्तीकरणाकडे टाकलेले ठोस पाऊल आहे. शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम झालेल्या या मुली उद्याच्या आत्मनिर्भर महिलांमध्ये रूपांतरित होतील, याचा आम्हाला अभिमान आहे.”

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments