Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedफॉईड एक्सप्रेशन्सच्या मुंबई विभाग स्पर्धेत बीएनसीएला सुवर्ण पुरस्कार साकारला ‌‘मानस‌’ हा ‌‘सूप्त...

फॉईड एक्सप्रेशन्सच्या मुंबई विभाग स्पर्धेत बीएनसीएला सुवर्ण पुरस्कार साकारला ‌‘मानस‌’ हा ‌‘सूप्त मनाच्या लहरी‌’ यावरील त्रिमिती आकृतीबंध

पुणे, दि. 31 डिसेंबर २०२५ : फॉईड एक्सप्रेशन्स या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आर्किटेक्चर आणि इंटिरियर डिझाईन क्षेत्रातील मुंबई विभाग स्पर्धेत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनच्या (बीएनसीए) चार विद्यर्थिनींनींना सुवर्ण पुरस्कार मिळाला. त्यांनी या स्पर्धेत ‌‘मानस :‌ ‘सूप्त मनाच्या लहरी‌’ या अमूर्त विषयावर एक त्रिमिती आकृतीबंध साकार केला.

 

बीएनसीएच्या पुरस्कारप्राप्त संघात मधुरा फडणीस, देवकी मंधाने, हरिता राघवेंद्रन आणि मोहिनी मांडके या विद्यार्थिनींंचा समावेश असून त्यांना बीएनसीएच्या प्रा. अमृता बर्वे आणि प्रा. देवा प्रसाद यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या विद्यार्थिनींचे अभिनंदन प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांनी केले.

 

यासंबंधी माहिती देताना प्रा. अमृता बर्वे म्हणाल्या की, या आकृतीबंधासाठी आम्ही चार फूट लांब, रुंद आणि आठ फूट उंचीचे मेटालिक (धातूचा परिणाम साधणारे) तीन पॅनल्स उभारले. त्याच्या मधल्या भागात पाणी भरलेल्या ट्रेखालून प्रकाशाच्या परावर्तनाच्या लहरी त्यावर सोडण्यात आल्या. यासाठी आम्हाला बीएनसीएच्या डिजिटल आर्किटेक्चर विभागाचे सहकार्य लाभले.

 

यासंबंधी मधुरा फडणीस म्हणाली की, ‌‘मानस‌’ या आकृतीबंधातून मनाच्या सूप्त अदृश्य लहरी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्यामध्ये आकृतीबंधाखालील पाण्यातून परावर्तीत होणारा प्रकाश प्रतिसाद देणाऱ्या प्रतिकात्मक स्वरूपात दाखवण्यात आला आहे. तर आकृतीबंधातला बंदिस्त सेंद्रीय आकार हा त्यामधील अंतर्गत अशी न दिसणारी आवस्था असून त्यातून केवळ भावना या प्रकाश लहरींच्या अरुंद फटींमधून बाहेर पडताना ही सुप्त मनोवस्था जणू तुकड्या-तुकड्यांनी अभिव्यक्त होते.

 

देवकी मंधानेे म्हणाली की, आतील पाण्यावरील परावर्तीत प्रकाशकिरणे ही मनातील द्रव्यात्मक विचार व बदलत्या भावभावनांचे द्योतक म्हणून सूचीत केले आहे. विद्युत मोटारीतून पाण्यात तयार होणाऱ्या लहरींमुळे बदलत्या प्रकाशाचे विविध अमूर्त आकार तयार होतात. त्यातून निर्माण होणारी मनाची अस्वस्थता, त्याचे विविध थर आणि प्रमाणबद्ध नसलेल्या मनाच्या अव्यक्त आवस्था दर्शवतात.

 

फॉईड एक्सप्रेशन्स स्पर्धेत अहमदाबादच्या सेप्ट विद्यापीठाला प्लॅटिनम आणि हिरक पुरस्कार तर मुंबईतील गरवारे इन्स्टीट्यूट ऑफ करिअर ॲण्ड डेव्हलपमेट या संस्थेला रौप्य पुरस्का

र मिळाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments